शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदींना जिरेटोप घातल्याने वादंग; टीकेनंतर प्रफुल्ल पटेलांनी शिवप्रेमींना दिला 'हा' शब्द
2
निवडणूक प्रचारात कांद्यासाठी आंदोलनाची घोषणा; पण लंकेंनी आता शेतकऱ्यांना केलं नवं आवाहन!
3
"आमच्या घरी ईद साजरी केली जायची"; पंतप्रधान मोदींनी सांगितला मुस्लिम शेजाऱ्यांचा किस्सा
4
12वी पास कंगनाकडे कोट्यवधींचे हीरे, एकाच दिवसात खरेदी केल्या LIC च्या 50 पॉलिसी, जाणून घ्या किती आहे संपत्ती?
5
मराठमोळ्या अभिनेत्रीला झालाय गंभीर आजार, व्हिडिओ शेअर करत म्हणाली, 'मी प्रेग्नंट नाही...'
6
गंभीर हसल्याशिवाय क्रशला प्रपोज करणार नाही; तरूणीच्या पोस्टरला भारतीय दिग्गजाचं उत्तर
7
PM Modi Net Worth: कोणत्या बँकेत आहे PM नरेंद्र मोदींचं खातं, कुठे आहे गुंतवणूक? पाहा डिटेल्स
8
सत्तापिपासून भाजपा मृतदेहांवरून रॅली काढतंय का? मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून काँग्रेसचा जळजळीत सवाल
9
'लोकांचा जीव जातोय आणि हिला डान्स सुचतोय'; पाऊस पडल्यानंतर रील केल्यामुळे मन्नारा चोप्रा ट्रोल
10
'नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा नक्कीच पंतप्रधान होतील, आम्हालाही त्यांच्यासारख्या नेत्याची गरज; पाकिस्तानी अब्जाधीशांनी केले कौतुक
11
Kangana Ranaut : "तुम्ही मला एकदा मारलंत तर अनेक वेळा..."; कंगना राणौतचं विक्रमादित्य सिंहांवर टीकास्त्र
12
'अनिल कपूरसारखा पती नको' असं का म्हणाली होती माधुरी दीक्षित? इंटरेस्टिंग आहे यामागचं कारण
13
IPL Playoffsच्या २ जागांसाठी ५ संघ शर्यतीत; SRH ला ८७.३%, CSK ला ७२.७% टक्के चान्स, तर RCBला...
14
राज ठाकरेंच्या पाठिंब्यानं महायुतीला बळ; भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे 'शिवतीर्थ'वर
15
Video - ना स्ट्रेचर, ना कोणाची मदत; आजारी वडिलांना उचलून घेऊन रुग्णालयात फिरत राहिला लेक
16
सूर्यावर भीषण स्फोट; ISROच्या आदित्य L-1 आणि चांद्रयान-2 च्या कॅमेऱ्यात कैद
17
IPL मुळे भारताच्या वाट्याला T20 WC पूर्वी १ सराव सामना; दोन बॅचमध्ये संघ अमेरिकेला जाणार
18
सांगलीच्या निर्णयात घाई केली; भाजपा प्रवेशाबाबत विश्वजित कदमांचं मोठं विधान
19
SBI'ने ग्राहकांना दिली भेट! एफडीवरील व्याजदरात केली मोठी वाढ, पाहा नवे दर
20
Corona Virus : चिंताजनक! भारतात आला कोरोनाचा नवा व्हेरिएंट; 'ही' आहेत लक्षणं, लोकांसाठी किती धोकादायक?

निकाल ऐकण्यासाठी अलोट गर्दी, विजेत्यांचा जल्लोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2017 8:02 PM

वाशिम: जिल्ह्यातील २६१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शनिवार ७ आॅक्टोबर रोजी मतदान झाल्यानंतर ९ आॅक्टोबर रोजी या निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया पार पडली. या मतमोजणीच्या वेळी निकाल ऐकण्यासाठी मतमोजणील केंद्रांवर ग्रामस्थांची अलोट गर्दी उसळली होती. निकालानंतर संबंधित विजेत्या उमेदवारांसह समर्थकांनी मतमोजणी केंद्रांजवळच जल्लोष केला.  

ठळक मुद्देग्रामपंचायत निवडणूकमतमोजणी प्रक्रिया शिस्तबद्ध पद्धतीने

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम: जिल्ह्यातील २६१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शनिवार ७ आॅक्टोबर रोजी मतदान झाल्यानंतर ९ आॅक्टोबर रोजी या निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया पार पडली. या मतमोजणीच्या वेळी निकाल ऐकण्यासाठी मतमोजणील केंद्रांवर ग्रामस्थांची अलोट गर्दी उसळली होती. निकालानंतर संबंधित विजेत्या उमेदवारांसह समर्थकांनी मतमोजणी केंद्रांजवळच जल्लोष केला.  शनिवारी पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणूक मतदान प्रक्रियेत कारंजा तालुक्यातील ५०,  रिसोडमधील ४३, वाशिममधील ४८, मंगरुळपीरमधील ३३, मालेगावातील ४७; तर मानोरा  तालुक्यातील ४० अशा एकूण २६१ ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले. यावेळी ग्रामपंचायतच्या सरपंच पदाची निवड थेट मतदारांकडून होणार असल्याने या निवडणुकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते. दरम्यान, मतदान प्रक्रिया शांततेत पार पडल्यानंतर ८ आॅक्टोबर रोजी मतमोजणी प्रक्रियेपूर्वीच सर्व केंद्रावर सरंपच आणि सदस्य पदांच्या उमेदवारांसह त्यांच्या समर्थकांनी ठिय्या मांडला होता. हजारोच्या संख्येने ग्रामस्थांचीही उपस्थिती होती. वाशिम तालुक्यातील ग्रामपंचायतींची मतमोजणी  बसस्थानकाजवळील कोरोनेशन हॉल, रिसोड तालुक्यातील ग्रामपंचायतींची मतमोजणी रिसोडच्या  बाबासाहेब धाबेकर विद्यालयातील, इनडोअर स्टेडिअममध्ये मालेगाव तालुक्यातील ग्रामपंचायतींची तहसील कार्यालयावर, मंगरुळपीर तालुक्यातील ग्रामपंचायतींची लाल बहादूर शास्त्री भवनात, कारंजा तालुक्यातील ग्रामपंचायतींची मंगरुळपीर रोडवरील शेतकरी निवास सभागृहात, तर मानोरा तालुक्यातील ग्रामपंचायतींची शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शांततेत पार पडावी, यासाठी निवडणूक विभाग आणि पोलिस प्रशासनाने जय्यत तयारी केली होती. मतमोजणीचे निकाल लागल्यानंतर संबंधित ग्रामपंचायतचे नवनिर्वाचित सरंपंच, सदस्यांसह ग्रामस्थांनी मतमोजणी केंद्रांवर जल्लोष केला.