शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

दोन महिन्यांत निर्धारित उद्दिष्टाच्या केवळ ३१ टक्के पीककर्जाचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2020 11:17 IST

११ जुलैपर्यत केवळ ६८ हजार ९८१ शेतकऱ्यांच्या खात्यात ४९५ कोटी १२ लाख रुपयांचे पीककर्ज जमा होऊ शकले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात यंदा १६०० कोटी रुपये पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट असताना केवळ ३०.९५ टक्के पीकर्जाचे वितरण १० जुलैपर्यंत करण्यात आले आहे. विशेष म्हणजे महिनाभरापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी पीककर्ज वाटपाला गती देण्याचे निर्देश दिले होते, तर पालकमंत्र्यांनीही २९ जून रोजी पीककर्ज वाटपाला गती देण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर ११ जुलैपर्यत केवळ ६८ हजार ९८१ शेतकऱ्यांच्या खात्यात ४९५ कोटी १२ लाख रुपयांचे पीककर्ज जमा होऊ शकले आहे.कोरोना संसर्गामुळे उद्भवलेल्या परिस्थितीने शेतकरी अडचणीत असताना पीककर्ज वाटपाला गती देण्यात आलेली नाही. जिल्ह्यात यंदा १६०० कोटी रुपये पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी जिल्ह्यातील १ लाख १५ हजार १७८ शेतकरी पात्र आहेत. यात महात्मा ज्योतीराव फुले कर्जमुक्ती योजनेत पात्र ठरलेल्या शेतकºयांचा समावेश आहे. या योजनेतील शेतकºयांना कर्जमुक्तीच्या लाभासाठी आधार प्रमाणीकरण गरजेचे होते. लॉकडाऊनमुळे ही प्रक्रिया बंद पडली. त्यामुळे पीककर्ज वाटपावरही परिणाम झाला. तथापि, १८ जून रोजी जिल्ह्यात पुन्हा आधार प्रमाणीकरण प्रक्रियेला सुरुवात झाली आणि वंचित असलेल्या हजारो शेतकºयांनी आधार प्रमाणीकरणही केले. त्यामुळे पीककर्ज वाटपाची गती वाढणे अपेक्षीत होते; परंतु ११ जुलैपर्यंतही निर्धारित उद्दिष्टाच्या तुलनेत केवळ ३०.९५ टक्के पीककर्ज वाटप जिल्ह्यात होऊ शकले आहे. त्यात ६८ हजार ९८१ शेतकºयांच्या खात्यात ४९५ कोटी १२ लाख रुपयांचे पीककर्ज जमा झाले आहे.

४६ हजार १९७ शेतकºयांना प्रतिक्षाजिल्ह्यातील १ लाख १५ हजार १७८ शेतकरी पीककर्जासाठी पात्र आहेत. खरीप हंगामाचा विचार करता या शेतकºयांना ३१ जुलैपर्यंत पीककर्ज देण्याचे शासनाचे निर्देश आहेत. तथापि, ११ जुलैपर्यंत केवळ ६८ हजार ९८१ शेतकºयांना पीककर्जाचा लाभ मिळाला असून, अद्यापही ४६ हजार १९७ शेतकरी पीककर्जाची प्रतिक्षा करीत आहेत. खरीप पेरणीचा वेळ निघून जात असताना तातडीने पीककर्ज मिळण्याची अपेक्षा आहे.५९ टक्के पात्र शेतकºयांना लाभजिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात १६०० कोटी पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट आहे. यात पात्र असलेल्या १ लाख १५ हजार १७८ शेतकºयांचा समावेश असून, त्यापैकी ६८ हजार ९८१ शेतकºयांच्या खात्यात ४९५ कोटी १२ लाख रुपयांचे पीककर्ज जमा झाले आहे. पात्र शेतकºयांच्या पीककर्ज वितरणाचे हे प्रमाण ५९.८९ टक्के आहे.जिल्ह्यात आधार प्रमाणीकरण प्रक्रिया बंद असल्याने पीककर्ज वितरणाच्या प्रक्रियेवर परिणाम झाला होता. आता आधार प्रमाणीकरण सुरू झाल्याने या प्रक्रियेला वेग देण्यात आला आहे. पीककर्जासाठी पात्र असलेला कोणताही शेतकरी पीककर्जापासून वंचित राहणार नाही, याची दखल घेतली जात आहे.- रवि गडेकर,जिल्हा उपनिबंधक, वाशिम

टॅग्स :washimवाशिमCrop Loanपीक कर्जFarmerशेतकरी