शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

अकोला-परळी-अकोला पॅसेंजर पुन्हा अंशत: रद्द

By दिनेश पठाडे | Updated: September 16, 2023 16:51 IST

नांदेड रेल्वे विभागाने ४ ते १० सप्टेंबरपर्यंत  काही रेल्वे गाड्या रद्द तर काही गाड्या अंशत: रद्द केल्या होत्या.

वाशिम : दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड रेल्वे विभागातील रेल्वे रुळाची दुरुस्ती काम करण्याकरिता रोलिंग कॉरिडॉर ब्लॉक घेण्यात आला आहे. यापूर्वी अकोला-पूर्णा मार्गावरुन धावणारी अकोला-परळी पॅसेंजर १० सप्टेंबरपर्यंत अंशत: रद्द करण्यात आली होती. पुन्हा त्याच कारणास्तव अकोला-परळी-अकोला पॅसेंजर २४ सप्टेंबरपर्यंत अंशत: रद्द करण्यात आली असून अकोला-परळी वैजनाथ पूर्णापर्यंत आणि परळी-अकोला परभणी ते अकोलापर्यंत धावणार आहे.

नांदेड रेल्वे विभागाने ४ ते १० सप्टेंबरपर्यंत  काही रेल्वे गाड्या रद्द तर काही गाड्या अंशत: रद्द केल्या होत्या. त्यानंतर पुन्हा १६ सप्टेंबर रोजी जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार अकोला-पूर्णा मार्गावरुन धावणारी अकोला-परळी वैजनाथ-अकोला (अप-डाऊन) पॅसेंजर अंशत: रद्द करण्यात आली.  गाडी क्रमांक ०७७७४ अकोला-परळी पॅसेंजर पुढील १७ ते २४ सप्टेंबरपर्यंत पूर्णा रेल्वेस्थानकापर्यंतच धावणार आहे. ही गाडी पूर्णा-परळी दरम्यान अंशत: रद्द करण्यात आली आहे. तर गाडी क्रमांक ०७६०० परळी -अकोला पॅसेंजर १८ ते २४ सप्टेंबरपर्यंत परळी-परभणी दरम्यान अंशत: रद्द असणार आहे.  ही रेल्वे या कालावधीत परभणी ते अकोला दरम्यान धावेल.  वाशिमवरुन थेट परळी गाठणारी पॅसेंजर रेल्वेच अंशत: रद्द करण्यात आल्याने भाविकांना काहीसा अडचणींचा सामना करावा लागणार आहे.नांदेड-श्रीगंगानगर एक्स्प्रेसच्या मार्गात बदल

बर्नाला-हदियाला दरम्यान दुहेरीकरणाचे काम पूर्ण करण्याकरिता लाइल ब्लॉक घेण्यात आला आहे. यामुळे अकोला-पूर्णा मार्गावरुन धावणारी नांदेड-श्रीगंगानगर एक्स्प्रेसच्या तात्पुरता बदल करण्यात आला आहे. गाडी क्रमांक १२४३९, १२४८५, १२४८६, १२४४० नांदेड-श्रीगंगानगर-नांदेड एक्स्प्रेस १७ ते २२ सप्टेंबर दरम्यान संगपूर, धुरी, बर्नाला, रामपुरा फुल ही स्थानके वगळण्यात आली असून ही रेल्वे या कालावधीत सोनारपूर मार्गे धावेल.

टॅग्स :washimवाशिम