शहरं
Join us  
Trending Stories
1
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
2
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
3
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
4
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
5
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
6
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
7
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
8
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
9
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
10
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
11
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
12
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
13
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू
14
अहमदाबाद प्लेन क्रॅशसंदर्भात बाबा रामदेव यांना वेगळाच संशय, स्पष्टच बोलले! केली मोठी मागणी
15
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
16
Tarot Card: कष्ट करावे लागतील, तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
17
Ahmedabad Plane Crash : कॅन्सरने आईला हिरावून नेलं, अपघातामुळे वडिलांचं छत्र हरपलं; १८ दिवसांत २ चिमुकल्या अनाथ
18
आम्ही असीम मुनीरला बोलावलेलेच नाही; अमेरिकेचा खुलासा, पाकिस्तान तोंडावर आपटला
19
काव्या मारन विवाहबंधनात अडकणार? हा प्रसिद्ध संगीतकार करतोय डेट, रजनीकांत बोलणी करायला... 
20
Video: वेदनने कळवळला, धावताना लंगडला... पण तरीही टेम्बा बवुमा ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना नडला, ठोकलं झुंजार अर्धशतक

बसस्थानकातील बेवारस ‘पर्स’ने उडाली पोलिसांची तारांबळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2019 15:41 IST

बेवारस पर्समध्ये नेमके काय आहे, याची चाचपणी करण्यापूर्वी बॉम्ब शोधक व नाशक पथकाने बसस्थानकात थांबून असलेल्या सर्व प्रवाशांना तत्काळ बाहेर जाण्याच्या सूचना केल्या.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : नेहमीप्रमाणे शुक्रवार, २७ डिसेंबरलाही एस.टी.ने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीने वाशिमचे बसस्थानक गजबजले होते. अशात फलाटातील आसनावर एकेठिकाणी पांढºया रंगाची पर्स बेवारस आढळली. त्याची माहिती तत्काळ पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर मात्र पर्समध्ये नेमके काय आहे, याचा शोध घेताना सलग २ तास पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली.यापूर्वी महाराष्ट्रात विविध ठिकाणी बेवारस साहित्यांव्दारे घातपाताच्या घटना घडलेल्या आहेत. त्या पृष्ठभुमिवर वाशिम पोलिस दलही सक्रीय असून जिल्हा पोलिस अधीक्षक वसंत परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली बॉम्ब शोधक व नाशक पथक, श्वान पथकामार्फत जिल्हाभर तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. यादरम्यान शुक्रवारी सायंकाळी ९ वाजताच्या सुमारास वाशिम बसस्थानकातील फलाटावर एक बेवारस पर्स ठेऊन असल्याचे आढळून आले. त्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक राखोंडे यांनी तत्काळ बॉम्ब शोधक पथकाचे पोलिस उपनिरीक्षक एकनाथ राठोड यांना दिली. त्यावरून राठोड यांच्या पथकाने सर्व आवश्यक साहित्य घेऊन घटनास्थळी धाव घेतली. यासोबतच कृष्णा आणि प्रिन्स नामक श्वानांचे पथकही दाखल झाले. पर्स बेवारस असल्याने त्यात घातपात घडविण्याचे साहित्य देखील असू शकते, ही बाब लक्षात घेऊन सुरूवातीला संपूर्ण बसस्थानक निर्मनुष्य करण्यात आले. परगावी जाणाºया बसेस जागीच थांबविण्यात येऊन पोलिसांनी ‘स्कॅनिंग, एक्स-रे मशीन’ व श्वान पथकामार्फत कसून तपास केला. दीड तास चाललेल्या या प्रक्रियेनंतर पर्समध्ये घातपाताचे कुठलेही साहित्य नसल्याचे निदर्शनास आले आणि पोलिसांची ओढाताण अखेर संपुष्टात आली. तपासकामी राहुल पाटील, दशरथ ढोके, अजय घाटोळे, सत्यप्रकाश सुपारे यांच्यासह अन्य पोलिस कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला.अन् क्षणात झाले बसस्थानक रिकामेबेवारस पर्समध्ये नेमके काय आहे, याची चाचपणी करण्यापूर्वी बॉम्ब शोधक व नाशक पथकाने बसस्थानकात थांबून असलेल्या सर्व प्रवाशांना तत्काळ बाहेर जाण्याच्या सूचना केल्या. जीवाच्या भितीने प्रवाशांनीही सूचनेचे पालन केले आणि क्षणात बसस्थानक रिकामे झाले.जिल्ह्यात घातपाताची कुठलीही घटना घडू नये, या उद्देशाने जिल्हा पोलिस अधीक्षक वसंत परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली गत काही दिवसांपासून तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. शुक्रवारी बेवारस पर्सबाबत माहिती मिळाल्यानंतर त्याठिकाणी देखील सलग दोन तास तपासकार्य करण्यात आले; मात्र पर्समध्ये २१२० रुपये रोख रक्कम व ‘कॉस्मेटिक’ साहित्याशिवाय काही आढळले नाही.- एकनाथ राठोडपोलिस निरीक्षक, बॉम्ब शोधक पथक

टॅग्स :washimवाशिम