शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

कीटकनाशकांच्या विक्रीवर कृषी विभागाचा ‘वॉच’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2018 14:00 IST

कृषी सेवा केंद्रात विकल्या जाणाऱ्या  कीटकनाशकांची तपासणी करण्याबरोबरच फवारणी यंत्रांचीही गुण नियंत्रण पथकांमार्फत तपासणी केली जात आहे.

ठळक मुद्दे गतवर्षी कीटकनाशकांची फवारणी करताना विषबाधा होऊन २०० हून अधिक शेतकºयांचा बळी गेला. गतवर्षीच्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, शेतकऱ्यांची फसवणूक होऊ न निष्पाप बळी जाऊ नयेत म्हणून कृषी विभाग सजग झाला आहे.

वाशिम: गतवर्षी अमरावती विभागात कीटकनाशकांच्या फवारणीमुळे विषबाधा झाल्याने शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या. नियमबाह्य अणि बोगस कीटकनाशकाच्या वापरामुळे हा प्रकार घडला. यंदा हा प्रकार होऊ नये म्हणून कृषी विभाग कमालीची दक्षता बाळगून आहे. यासाठी कृषी सेवा केंद्रात विकल्या जाणाऱ्या  कीटकनाशकांची तपासणी करण्याबरोबरच फवारणी यंत्रांचीही गुण नियंत्रण पथकांमार्फत तपासणी केली जात आहे.अमरावती विभागात गतवर्षी कीटकनाशकांची फवारणी करताना विषबाधा होऊन २०० हून अधिक शेतकºयांचा बळी गेला. प्रामुख्याने यवतमाळ जिल्ह्यात याचे सर्वाधिक प्रमाण होते. या प्रकाराची दखल राज्य शासनाने घेऊन कृषी सेवा केंद्रांची तपासणी करण्याचे आदेश कृषी विभागाला दिले होते. या घटनांनंतर काही कृषी सेवा केंद्रांचे परवाने रद्द करण्यासह काहींवर कायदेशीर कारवाईसुद्धा झाली होती. आता यंदाच्या खरीप हंगामातील पेरणी ७० टक्क्यांहून अधिक आटोपली असून, सुरुवातीच्या पेरणीची पिके चांगली तरारली आहेत. या पिकांवर कुठेकुठे अळ्या, किडींचा प्रादुर्भाव होत असताना शेतकऱ्यांनी फवारणीची लगबग सुरू केली आहे. अशात गतवर्षीच्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, शेतकऱ्यांची फसवणूक होऊ न निष्पाप बळी जाऊ नयेत म्हणून कृषी विभाग सजग झाला आहे. कृषी सेवा केंद्र प्रमाणित औषधांचीच विक्री करीत आहेत की बनावट आणि जहाल कीटकनाशके विकून शेतकऱ्यांचा जीव धोक्यात घालत आहेत, याची पडताळणी करण्यासाठी कृषी विभागाकडून कृषी सेवा केंद्रांची पाहणी करण्यात येत आहे. या दरम्यान, परवाना नसलेल्या काही कीटनाशकांच्या विक्रीवर कृषी विभागाने बंदीही घातली आहे.शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये, जहाल कीटकनाशकांच्या विक्रीतून शेतकºयांचा जीव धोक्यात येऊ नये, याची दक्षता कृषी विभाग बाळगत असून, यासाठीच कृषी सेवा केंद्रांवरील कीटकनाशकांची गुण नियंत्रण पथकांमार्फत तपासणी करण्यात येत आहे. या तपासणीत परवाना नसलेल्या किंवा जहाल कीटकनाशकांची विक्री करण्यात येत असल्याचे आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाईसुद्धा करण्यात येत आहे.-दत्तात्रय गावसाने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वाशिम.

 

टॅग्स :washimवाशिमagricultureशेती