शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात कृषीपंपाची थकबाकी ३१९ कोटी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2017 20:43 IST

वाशिम : जिल्ह्यातील कृषीपंपधारक शेतक-यांकडे सन २०१४ पासून विजेची थकबाकी असून ती आजमितीस तब्बल ३१९ कोटी रुपयांवर पोहचली आहे. यामुळे महावितरण सर्वार्थाने हतबल झाले आहे.

ठळक मुद्देमहावितरण हतबल‘कृषी संजिवनी’त वसूल झाले केवळ २५ लाख रुपये

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यातील कृषीपंपधारक शेतक-यांकडे सन २०१४ पासून विजेची थकबाकी असून ती आजमितीस तब्बल ३१९ कोटी रुपयांवर पोहचली आहे. यामुळे महावितरण सर्वार्थाने हतबल झाले आहे. दरम्यान, शेतक-यांना थकबाकी अदा करणे अवघड जाऊ नये, यासाठी महावितरणने अंमलात आणलेल्या ‘मुख्यमंत्री कृषी संजीवनी’ या योजनेलाही विशेष प्रतिसाद मिळाला नाही. या योजनेत १८ नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यातील केवळ १०७५ शेतकºयांनीच सहभाग नोंदविला असून २५.८० लाख रुपये वसूली झाल्याची माहिती येथील अधीक्षक अभियंता व्ही.बी.बेथारिया यांनी मंगळवारी दिली. वाशिम जिल्ह्यात सुमारे २६ हजार हेक्टर क्षेत्रावर सिंचनासाठी वीज पुरविली जाते. त्यात ५२ हजार ५०० शेतकºयांना कृषीपंपाची वीजजोडणी देण्यात आली आहे. विजेच्या सुविधांमुळे शेतकºयांना रब्बी हंगामात गहू, हरभरा, सूर्यफुल, तीळ, करडई आदी पिकांसह भाजीपाल्याची लागवड करणे शक्य होत आहे. काही शेतकरी नियमित न चुकता विजेचे देयक अदा करतात. मात्र, बहुतांश शेतकरी विविध कारणांमुळे नियमित वीज देयक अदा करू शकत नाहीत. अशा शेतकºयांकडे असलेली थकबाकी सद्या ३१९ कोटी रुपयांवर पोहचली आहे. ही रक्कम वसूल करताना महावितरणच्या नाकी नऊ येत आहे. दरम्यान, कृषीपंप थकबाकी वसूलीची प्रक्रिया सोपी व्हावी तद्वतच थकबाकीदार शेतकºयांनाही सोयीचे व्हावे, यासाठी शासनाने मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजनेची आखणी केली. मात्र, त्यास थकबाकीदारांमधून विशेष प्रतिसाद लाभलेला नाही. 

टॅग्स :mahavitaranमहावितरण