शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम येथे कृषीमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार कृषी महोत्सव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 21:57 IST

वाशिम : वाशिम येथे २१ ते २५ फेब्रुवारीदरम्यान होणा-या जिल्हा कृषी महोत्सवाच्या ठिकाणामध्ये बदल झाला असून, आता सदर महोत्सव जिल्हा क्रीडा संकुलऐवजी वाशिम शहरालगतच असलेल्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रामध्ये होणार आहे. कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्यावतीने आयोजित या महोत्सवाचे उदघाटन २१ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता राज्याचे कृषी व फलोत्पादन मंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या हस्ते होणार आहे. 

ठळक मुद्दे२१ ते २५ फेब्रुवारीदरम्यान पाच दिवस चालणार महोत्सव महोत्सवाच्या ठिकाणामध्ये बदल

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम : वाशिम येथे २१ ते २५ फेब्रुवारीदरम्यान होणा-या जिल्हा कृषी महोत्सवाच्या ठिकाणामध्ये बदल झाला असून, आता सदर महोत्सव जिल्हा क्रीडा संकुलऐवजी वाशिम शहरालगतच असलेल्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रामध्ये होणार आहे. कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्यावतीने आयोजित या महोत्सवाचे उदघाटन २१ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता राज्याचे कृषी व फलोत्पादन मंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या हस्ते होणार आहे. महोत्सवाच्या अध्यक्षस्थानी महसूल राज्यमंत्री तथा वाशिम जिल्हाचे पालकमंत्री संजय राठोड राहणार आहेत. यावेळी ऊर्जा, पर्यटन राज्यमंत्री तथा वाशिम जिल्ह्याचे सह पालकमंत्री मदन येरावार, नगरविकास, गृह (शहरे) राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, कृषी व फलोत्पादन राज्यमंत्री सदाभाऊ खोत, जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख, खासदार भावना गवळी, खासदार संजय धोत्रे, आमदार गोपीकिशन बाजोरिया, आमदार श्रीकांत देशपांडे, आमदार लखन मलिक, आमदार राजेंद्र पाटणी, आमदार अमित झनक, नगराध्यक्ष अशोक हेडा, जिल्हा परिषद कृषी सभापती विश्वनाथ सानप, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, विभागीय कृषि सहसंचालक एस. के. नागरे आदी उपस्थित राहणार आहेत.यावेळी प्रयोगशील शेतक-यांना प्रेरणा म्हणून तसेच इतर शेतकºयांसमोर आदर्श निर्माण व्हावा यासाठी विविध ‘स्टॉल’ राहणार आहेत. कृषी प्रदर्शन, शेतकरी व महिला बचत गटांच्या मालांचे तसेच सेंद्रिय शेती मालाचे प्रदर्शन तसेच शेतकºयांसाठी विविध योजना व उपक्रमांची माहिती, संशोधित कृषि तंत्रज्ञान, शेतीतील नाविन्यपूर्ण बाबी, शेतक-यांचे अनुभव, विक्री व्यवस्थापन आदीबाबत माहितीपर व्याख्याने आयोजित केली जाणार आहेत. या महोत्सवादरम्यान महोत्सव स्थळी शेतकरी बचत गटांनी उत्पादित केलेल्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध केली जाणार आहे. वाशिम जिल्हा कृषी महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक डॉ. दिनकर जाधव यांनी शुक्रवारी केले.

टॅग्स :Pandurang Phundkarपांडुरंग फुंडकरagricultureशेतीwashimवाशिम