शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

१३ दिवसांनी मंगरुळपीरचा पाणी पुरवठा सुरळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2019 12:59 IST

मंगरुळपीर (वाशिम): तब्बल १२ दिवसांपासून ठप्प असलेला मंगरुळपीर शहराचा पाणी पुरवठा शुक्रवार २२ मार्च रोजी १३ व्या दिवशी सुरळीत झाला.

 लोकमत न्यूज नेटवर्कमंगरुळपीर (वाशिम): तब्बल १२ दिवसांपासून ठप्प असलेला मंगरुळपीर शहराचा पाणी पुरवठा शुक्रवार २२ मार्च रोजी १३ व्या दिवशी सुरळीत झाला. मोतसावंगा प्रकल्पातून मंगरुळपीर शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी बसविलेली जलवाहिनी फुटल्याने नागरिकांना कृत्रिम पाणीटंचाईचा त्रास सहन करावा लागत होता. या संदर्भात लोकमतने १९ मार्च रोजी वृत्त प्रकाशित करून नगर पालिका प्रशासनाचे लक्ष वेधले होते.  मंगरुळपीर तालुक्यात गतवर्षी ७९४.५३ मि.मी. पाऊस पडला. हे प्रमाण वार्षिक सरासरीच्या १०२ टक्के होते. त्यामुळेच तालुक्यातील जलाशय काठोकाठ भरले आणि यंदाच्या उन्हाळ्यात पाणीटंचाई जाणवणार नसल्याचे दिसू लागले; परंतु वाढलेले रब्बीचे क्षेत्र, पाण्याचा अवैध आणि वारेमा उपसा, तसेच रखरखत्या उन्हामुळे वेगाने होत असलेल्या बाष्पीभवनामुळे तालुक्यातील १५ पैकी निम्मे जलाशय कोरडे पडले. तथापि, मंगरुळपीर शहरासह इतर काही खेडेगावांना पाणी पुरवठा करणाºया मोतसावंगा प्रकल्पात अद्यापही ४० टक्क्यांच्या जवळपास जलसाठा आहे. त्यामुळे शहरवासियांसह या प्रकल्पावर अवलंबून असलेल्या खेडेगावांत पुरेसा पाणी पुरवठाही होत आहे. अशातच काही दिवसांपूर्वी या प्रकल्पातून मंगरुळपीर शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी जोडलेली जलवाहिनी फुटली. त्यामुळे शहराचा पाणी पुरवठा खंडीत झाला आणि नागरिकांची पाण्यासाठी भटकंती सुरू झाली. शहरातील काही हातपंप बंद पडले असताना नागरिकांच्या त्रासात अधिकच भर पडली होती. नगर पालिका प्रशासनाकडून मात्र, यावर तातडीचे उपाय करण्यात दिरंगाई होत असल्याचे दिसत होते. या पृष्ठभूमीवर लोकमतने १९ मार्च रोजीच्या अंकात मंगरुळपीर शहराचा पाणी पुरवठा आठ दिवसांपासून ठप्प, या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करून पालिका प्रशासनाचे नागरिकांच्या समस्येकडे लक्ष वेधले. प्रशासनानेही तातडीने दखल घेत जलवाहिनी दुरुस्तीचे काम सुरू केले. त्यात २१ मार्च रोजी पुन्हा शहरातील सांस्कृतिक भवनानजिक जलवाहिनी फुटल्याचा प्रकार घडला. त्यामुळे पाणी पुरवठा सुरळीत होण्यास विलंब लागला. अखेर शुक्र वार २२ मार्च रोजी शहरातील पाणी पुरवठा सुरळीत करण्यात आला. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.   जीर्ण जलवाहिनी बदलण्याची मागणी मंगरुळपीर शहराला पाणी पुरवठा करणाºया मोतसावंगा प्रकल्पाची जलवाहिनी दरवर्षी उन्हाळ्याच्या दिवसांतच फुटण्याचे प्रकार घडतात आणि त्याचा फटका नागरिकांना सहन करावा लागतो. यंदाही हा प्रकार घडला आहे. त्यामुळे नागरिकांना कृत्रिम पाणीटंचाईचा त्रास सहन करावा लागला. त्यातच फुटलेल्या जलवाहिनीतून लाखो लीटर पाण्याचा अपव्ययही झाला. त्यावरून जलवाहिनी जीर्ण झाल्याचे स्पष्ट होत असून, ही जलवाहिनी बदलण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. 

मोतसावंगा प्रकल्पावरून शहराला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी तीन ठिकाणी फुटली होती. ती दुरुस्त करण्यात आली असून, शुक्रवारपासूनच शहरातील सर्व ठिकाणचा पाणी पुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. नागरिकांनी नळांना तोट्या बसवून पाण्याचा अपव्यय टाळत पालिकेला सहकार्य करावे. -मिलिंद दारोकारमुख्याधिकारी नगर परिषद मंगरुळपीर

टॅग्स :washimवाशिमMangrulpirमंगरूळपीर