शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

चोख पडताळणीनंतरच नियुक्त होणार प्रशासक मंडळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 16:24 IST

येत्या दोन ते तीन दिवसांत वाशिम बाजार समितीवर प्रशासक मंंडळाची प्रत्यक्ष नियुक्ती केली जाणार असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक कटके यांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीवर अशासकीय प्रशासक मंडळ नियुक्त करण्यासंबंधीचे निर्देश महाराष्ट्र शासनाचे कार्यासन अधिकारी जयंत भोईर यांनी २३ जुलै रोजी दिले. त्यानुसार, संबंधित प्रशासकांचे बँक खाते आणि पोलिस ‘रेकॉर्ड’संबंधीची पडताळणी केली जात असून ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच प्रत्यक्षात प्रशासकीय मंडळ नियुक्त केले जाणार असल्याची माहिती सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक रमेश कटके यांनी मंगळवार, ३० जुलै रोजी दिले.वाशिम बाजार समितीमधील विविध स्वरूपातील गैरप्रकारांचे मुद्दे पावसाळी अधिवेशनात चांगलेच गाजले. दरम्यान, पणनमंत्र्यांच्या निर्देशावरून १ जुलै रोजी बाजार समितीमध्ये कार्यरत पुर्वीचे प्रशासक मंडळ बरखास्त करून सहायक निबंधक रमेश अंभोरे यांच्याकडे प्रशासक पदाची सूत्र देण्यात आली होती. अशात २३ जुलै रोजी महाराष्ट्र शासनाचे कार्यासन अधिकारी जयंत भोईर यांनी सहकारी संस्थेच्या जिल्हा उपनिबंधकांकडे पत्र पाठवून वाशिम कृषी बाजार समितीवर अशासकीय प्रशासक मंडळ स्थापित करण्याचे निर्देश दिले. त्यात मुख्य प्रशासक म्हणून उकळीपेन येथील संतोष चव्हाण यांचा समावेश असून अन्य प्रशासकांमध्ये विमला इढोळे, शांतीलाल मोदानी, मारोती वाबळे, शिवशंकर भोयर, मदन सावके, सुधाकर बर्वे, रामेश्वर महाले, रेणुका नागरे, नागोराव वाघ, धनाजी सारसकर, रेखा मापारी, कृष्णा महाले, गजानन जाधव, गोविंद चरखा, कैलास गोरे, रवि राऊत, दिलीप काष्टे यांचा समावेश आहे. या सर्व प्रशासकांची नियुक्ती करण्यापूर्वी ते कुठल्याही बँकेचे थकीत कर्जदार नसावेत. त्यानुषंगाने पडताळणी केली जात असून संबंधितांवर पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत का, याचीही चाचपणी केली जात आहे. ही प्रक्रिया सद्या अंतीम टप्प्यात असून येत्या दोन ते तीन दिवसांत वाशिम बाजार समितीवर प्रशासक मंंडळाची प्रत्यक्ष नियुक्ती केली जाणार असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक कटके यांनी दिली.

टॅग्स :washimवाशिमMarket committee washimबाजार समिती वाशिम