शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यातील १६३ ग्रा.पं.तींमध्ये प्रशासकराज!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2020 17:17 IST

१६३ ग्रामंपचायतींमधील विद्यमान सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांचा पाच वर्षांचा कालावधी ३१ आॅगस्टपर्यंत संपुष्टात येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : आॅगस्टमध्ये पाच वर्षांची मुदत संपणाºया जिल्ह्यातील १६३ ग्रामपंचायतींमध्ये प्रशासकांची नियुक्ती करण्यात येत असल्याचा आदेश जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) दीपक कुमार मीना यांनी जिल्ह्यातील सहाही पंचायत समितींच्या गटविकास अधिकाºयांना २४ आॅगस्ट रोजी दिला.जिल्ह्यात एकूण ४९१ ग्रामपंचायती असून, यापैकी १६३ ग्रामंपचायतींमधील विद्यमान सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांचा पाच वर्षांचा कालावधी ३१ आॅगस्टपर्यंत संपुष्टात येत आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभूमीवर ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. मुदत संपणाºया ग्रामपंचायतींमध्ये प्रशासक नेमण्याच्या शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील १६३ ग्रामपंचायतींमध्ये प्रशासकांची नियुक्ती करण्यात येत असल्याचा आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी मीना यांनी २४ आॅगस्ट रोजी सहाही पंचायत समितीच्या गटविकास अधिकाºयांना दिला. या आदेशानुसार एका प्रशासकाकडे केवळ एकाच ग्रामपंचायतीचा कार्यभार सोपविण्यात येणार आहे. गट अ, गट ब व गट क या प्रत्येक संवर्गातील अधिकारी, कर्मचाºयांकडे प्रशासकाची धूरा सोपविण्यात येणार आहे. यामध्ये गटशिक्षणाधिकारी, पशुधन विकास अधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी, विस्तार अधिकारी, कृषी अधिकारी, केंद्र प्रमुख, मुख्याध्यापकांचा समावेश आहे.

प्रशासकांना मिळणार प्रशिक्षण !गटशिक्षणाधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी, विस्तार अधिकारी, पशुधन विकास अधिकारी, कृषी अधिकारी, केंद्र प्रमुख, मुख्याध्यापकांना ग्राम पंचायतचा फारसा अनुभव नसतो. आर्थिक व्यवहार, विविध योजना, डिजिटल स्वाक्षरी यासह ग्रामपंचायतींच्या एकूण कामकाजाची माहिती देण्याबरोबरच या प्रशासकांना तज्ज्ञांकडून पंचायत समिती स्तरावर प्रशिक्षणही देण्यात येणार आहे.

टॅग्स :washimवाशिमgram panchayatग्राम पंचायत