शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

शिरपूर येथील अतिक्रमण हटविण्याची हालचाल गतीमान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 15:07 IST

अतिक्रमण हटविण्याकरिता जिल्हा प्रशासन निधी मंजूर करून देणार असून तसा प्रस्ताव प्रशासनाकडे सादर करण्याच्या सूचना याप्रसंगी तहसीलदारांनी ग्रामपंचायतीला दिल्या.

ठळक मुद्देजगप्रसिद्ध जैन मंदिर, जानगीर महाराज संस्थान व हजरत मिर्झा बाबा यांचा दर्गाह वसलेला आहे.गावातील सर्वच रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे.मो. इमदाद बागवान, पंकज देशमुख आणि वसंता देशमुख यांनी नागपूर खंडपिठात याचिका दाखल केली होती.

 शिरपूर जैन (वाशिम) : जैन धर्मियांची काशी म्हणून सर्वत्र नावलौकीक असलेल्या शिरपूर जैन येथील चौकाचौकात फोफावलेले अतिक्रमण हटविण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने तीन महिन्यांपूर्वी दिले. त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी लवकरच होणार असून यानुषंगाने २९ मे रोजी येथे पार पडलेल्या बैठकीत विविध विषयांवर सर्वंकष चर्चा करण्यात आली. अतिक्रमण हटविण्याकरिता जिल्हा प्रशासन निधी मंजूर करून देणार असून तसा प्रस्ताव प्रशासनाकडे सादर करण्याच्या सूचना याप्रसंगी तहसीलदारांनी ग्रामपंचायतीला दिल्या.शिरपूर जैन या गावाचा तिर्थक्षेत्र स्थळांच्या यादीत समावेश असून याठिकाणी जगप्रसिद्ध जैन मंदिर, जानगीर महाराज संस्थान व हजरत मिर्झा बाबा यांचा दर्गाह वसलेला आहे. त्यामुळे वर्षभर दर्शनाकरिता विविध समाजातील भाविकांची गावात तोबा गर्दी राहते. असे असताना गावातील सर्वच रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले असून यामुळे वाहतूक विस्कळित होण्यासोबतच वाहनधारकांनाही त्रास सहन करावा लागतो. ही बाब लक्षात घेवून शिरपूरजैन येथील अतिक्रमण तत्काळ हटविण्यात यावे, अशी मागणी करणारी याचिका गावातील मो. इमदाद बागवान, पंकज देशमुख आणि वसंता देशमुख यांनी नागपूर खंडपिठात याचिका दाखल केली होती. त्यावर २१ फेब्रुवारीला न्यायालयाने निर्णय दिला. पुढच्या तीन महिन्यात अतिक्रमणाचा प्रश्न कायमचा निकाली काढावा, असे आदेशात नमूद होते. तथापि, तीन महिन्याचा कालावधीत २१ मे रोजी संपला असतानाही न्यायालयाच्या निर्णयावर प्रत्यक्ष अंमलबजावणी झालेली नव्हती. दरम्यान, यासंदर्भात २९ मे रोजी मालेगाव येथील तहसील कार्यालयात पार पडलेल्या महत्वाच्या बैठकीत भूमी अभिलेख यंत्रणेने गावातील रस्त्यांची नकाशाप्रमाणे मोजणी करावी आणि लवकरात लवकर अतिक्रमण हटवावे. यासाठी लागणाºया निधीची जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मागणी नोंदविण्यात येईल, असे ठरविण्यात आले. 

टॅग्स :washimवाशिमShirpur Jainशिरपूर जैन