शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

मे अखेर बियाणे, खताचा पुरेसा साठा उपलब्ध होणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2020 16:19 IST

मे महिन्याअखेर आवश्यक बियाणे साठा विक्रीस उपलब्ध होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभुमीवर लागू असलेली संचारबंदी आणि ‘लॉकडाऊन’मुळे पुरेशा प्रमाणात खत आणि बियाणे उपलब्ध होण्यास विलंब लागत आहे. असे असले तरी मे अखेर हा प्रश्न पूर्णत: निकाली निघणार असून शेतकºयांनी काळजी करू नये, असे आवाहन जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी विकास बडगर यांनी केले.जिल्ह्यात ४ लाख १५ हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप हंगामातील पिकांची पेरणी केली जाते. त्यात २ लाख ९६ हजार ६० हेक्टर एवढे क्षेत्र सोयाबिन पिकाखालील असून साधारणत: ७७ हजार क्विंटल बियाणे त्यासाठी आवश्यक आहे. त्याचे नियोजन कृषी विभागाकडून केले जात आहे. विशेषत: बहुतांश शेतकरी घरचेच बियाणे वापरण्याचे नियोजन करित असल्याने बियाण्याची विशेष अडचण जाणवणार नसल्याची स्थिती आहे.यंदाच्या हंगामात आतापर्यंत महाबिजकडून ४८०० क्विंटल व खासगी कंपण्यांकडून २१९२ असे एकंदरित ६ हजार ९९२ क्विंटल बियाणे विक्री केंद्रावर उपलब्ध झाले आहे. मे महिन्याअखेर आवश्यक बियाणे साठा विक्रीस उपलब्ध होणार आहे.जिल्ह्यात खरीप हंगामासाठी ५० हजार मे.टन. रासायनिक खत आवश्यक असून पुणे कृषी आयुक्तालयाकडून ५६ हजार २९० मे.टन. खत साठा मंजूर झालेला आहे. सद्य:स्थितीत जिल्ह्यात विविध स्वरूपातील रासायनिक खतांचा २८ हजार २२८ मे.टन. एवढा साठा उपलब्ध असून मे अखेर १४७० मे.टन. युरिया उपलब्ध होणार आहे. तसेच डी.ए.पी. २९६० मे.टन., एम.ओ.पी. १२३० मे.टन., एन.पी.के. ४२२० मे.टन. खत शेतकºयांसाठी उपलब्ध होईल. त्यामुळे शेतकºयांनी काळजी न करता अधिकृत विक्रेत्याकडूनच रासायनिक खत व बियाणे खरेदी करावी. त्याची पक्की पावती जवळ ठेवावी. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी ‘फिजीकल डिस्टन्सिंग’चा नियम पाळावा, असे आवाहन कृषी विकास अधिकाºयांनी केले. कृषी आयुक्तांच्या आदेशानुसार, कापूस बीटी बियाणे विक्रीस सद्या मनाई करण्यात आलेली आहे. याबाबत जिल्ह्यातील सर्वच कृषी सेवा केंद्रांना तशा सूचना देण्यात आल्या असून कुणीही बीटी बियाण्याची विक्री करू नये, असे कृषी विकास अधिकाºयांनी कळविले.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेती