शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Narendra Modi Interview: उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांचा वारसा सांगण्याचा अधिकार आहे का?; मोदींचा थेट सवाल
2
Chandrashekhar Bawankule : "उद्धव ठाकरे यांच्यात हिंमत असेल तर..."; चंद्रशेखर बावनकुळे यांचं जाहीर आव्हान
3
तुम्ही औरंगजेबाचे फॅन आहात का?; संजय राऊतांच्या प्रश्नावर उद्धव ठाकरेंचा खोचक टोला
4
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना शुभदायी, लाभाच्या संधी; थकीत येणी मिळतील, सौभाग्याचा काळ!
5
Exclusive: 'बाळासाहेबांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याची प्रतिष्ठा मी जपली…', पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
6
'या' गोष्टींमुळे सुशांत सिंह राजपूत मृत्यूपूर्वी होता त्रस्त, मनोज वाजपेयी यांचा मोठा खुलासा, म्हणाले....
7
ओला ईलेक्ट्रीक स्कूटरवर वीज कोसळली, रस्त्यावर मोठा खड्डा पडला, एकाचा मृत्यू, दोन गंभीर
8
त्यांची शिवसेना म्हणजे 'एसंशी'; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
9
Exclusive:...म्हणून अजित पवार, एकनाथ शिंदे आमच्यासोबत आले; पंतप्रधान मोदींनी सांगितलं नेमकं काय घडलं!
10
Exclusive: राज ठाकरे आमच्यासाठी नवीन नाहीत, केवळ सत्तेसाठी एकत्र आलेलो नाही; पंतप्रधान मोदींची 'मन(से) की बात'
11
राहुल गांधी काय पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत का? मोदींसोबतच्या चर्चेवर स्मृती इराणींचा टोला
12
Exclusive: मेक इन इंडिया योजनेचा देशाला किती फायदा झाला? पंतप्रधान मोदींनी स्पष्टच सांगितले
13
आजचे राशीभविष्य - १२ मे २०२४; व्यापारात प्रगती व यश मिळू शकेल; धनलाभ होईल
14
आव्हान स्वीकारले! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत जाहीर चर्चेला राहुल गांधी तयार
15
“शरद पवार, उद्धव ठाकरे यांना आमिष दाखविण्याचा मोदींचा प्रयत्न”; काँग्रेसचा आरोप 
16
बुलेट्स कसाबच्या नव्हत्या तर कोणाच्या? प्रकाश आंबेडकर यांचा उज्ज्वल निकम यांना खडा सवाल
17
तीन टप्प्यांत कोणत्या पक्षाने घेतल्या सर्वाधिक सभा? मोदी, शाह, राहुल यांचा झंझावाती प्रचार
18
सर्जिकल अन् हवाई हल्ले करण्याची हिंमत काँग्रेस पक्षामध्ये नाही, पाकच्या गोळीला...: अमित शाह
19
भाजपा सत्तेत आल्यास अमित शाह पंतप्रधान होतील; अरविंद केजरीवाल यांची भविष्यवाणी
20
कोलकाता नाईट रायडर्स प्ले ऑफमध्ये! मुंबई इंडियन्सने हातचा सामना गमावला 

गुरुजींवर अतिरिक्त कामांचा बोजा, विद्यार्थ्यांचै शैक्षणिक नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2018 2:13 PM

मानोरा (वाशिम): जिल्हा परिषद शाळांतील शिक्षकांवर अतिरिक्त शासकीय कामांची जबाबदारी असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा (वाशिम): जिल्हा परिषद शाळांतील शिक्षकांवर अतिरिक्त शासकीय कामांची जबाबदारी असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. सद्यस्थितीत यंदाच्या सत्रातील प्रथम सत्राची परिक्षा सर्वत्र सुरू असताना जिल्ह्यातील अनेक गुरुजी मतदार नोंदणी कार्यक्रमात गुंतले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना मार्गदर्शनच मिळेनासे झाले असून, पालकवर्गात यामुळे नाराजी पसरली आहे.जिल्ह्यात आगामी काळात टप्प्याटप्प्याने जिल्हा परिषद, पंचायत समिती, लोकसभा, विधानसभा आदि निवडणूक होणार आहे. यासाठी निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार प्रशासनाकडून मतदार यादी अद्ययावत करण्याचे काम हाती घेण्यात आले असून, या कामासाठी मतदान केंद्र अधिकारी म्हणून जबाबदारी सोपविलेल्या शिक्षकांकडून मतदार यादीची पडताळणी करण्यासह मतदार नोंदणीचे काम करून घेण्यात येत आहे. प्रत्येक जिल्हा परिषद शाळेतील किमान दोन शिक्षक या कामांत गुंतले आहेत. त्यांच्याकडून ही जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्यात येत असली तरी, मतदार यादी अद्ययावती करणात अनेक अडचणी येत आहेत. सोयाबीन काढणीसह रब्बी पेरणीचा हंगाम सुरू असल्याने ग्रामीण भागातील शेतमजूर सकाळीच घरून बाहेर पडत असल्याने शिक्षकांना संध्याकाळपर्यंत या कामांतच वेळ घालवावा लागतो. याचा परिणाम शाळेच्या कामकाजावर आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होत आहे. विद्यार्थ्यांना ज्ञानाचे धडे देण्यासाठी शिक्षकांना वेळ मिळत नसल्याने शाळेतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर मोठा परिणाम होणार असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.

टॅग्स :washimवाशिमManoraमानोराTeacherशिक्षक