शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

अडाण नदीपात्र कोरडे पडले; टरबुज, खरबुजासह काकडीची पिके संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 18:21 IST

इंझोरी (वाशिम): जिल्ह्यातील मोठ्या नद्यांपैकी एक असलेल्या अडाण नदीचे पात्र पूर्णपणे कोरडे पडले आहे. त्यामुळे या नदीच्या पात्रात शेतकºयांनी लागवड केलेली पिके फुलण्यापूर्वीच संकटात सापडली आहेत. 

लोकमत न्यूज नेटवर्कइंझोरी (वाशिम): जिल्ह्यातील मोठ्या नद्यांपैकी एक असलेल्या अडाण नदीचे पात्र पूर्णपणे कोरडे पडले आहे. त्यामुळे या नदीच्या पात्रात शेतकºयांनी लागवड केलेली पिके फुलण्यापूर्वीच संकटात सापडली आहेत. जिल्ह्यातील मोठ्या नद्यांत समाविष्ट असलेल्या अडाण नदीचे पात्र जवळपास दीडशे मीटर रुंद असून, याच नदीवर मानोरा तालुक्यातील म्हसणी येथे अडाण प्रकल्पाची उभारणी करण्यात आली आहे. या प्रकल्पाच्या भरवशावर मानोरा तालुक्यातील २८ गावांसह कारंजा शहरातील नागरिकांची तहान भागविली जाते. त्याशिवाय याच प्रकल्पाच्या भरवशावर हजारो हेक्टर क्षेत्रात सिंचन केले जाते. या प्रकल्पामुळेच मानोरा-कारंजा मार्गावर इंझोरीनजिक असलेल्या नदीपात्रा उन्हाळा अखेरपर्यंत पाणी कायम राहते. त्यामुळे या नदीच्या पात्रात गाळपेर क्षेत्रावर अनेक शेतकरी, टरबूज, खरबूज, काकडीची मोठ्या प्रमाणावर लागवड करतात. त्यापासून शेतकºयांना लाखो रुपयांचे उत्पादनही होते, तसेच हरभरा आणि गहू पिकाचीही पेरणी या पात्रात केली जाते.

यंदा हरभरा गहू पिकाची काढणी झाल्यानंतर शेतकºयांनी गेल्या महिना दीड महिन्यापूर्वी या नदीपात्रात टरबूज, खरबूजासह काकडीची लागवड केली आहे.  या नदीपात्रातील ओलाव्यासह उथळ पाण्याचा उपसा करून ही पिके वाढविली जातात; परंतु आता उन्हाळा अर्ध्यावरच असताना या नदीचे पात्र पूर्णपणे कोरडे पडले आहे. त्यामुळे लागवड होऊन फुटभर उगवलेले पिकांचे वेल माना टाकू लागले आहेत. त्यामुळे आता उत्पादनाची आशा राहिली नसून, शेतकºयांनी या पिकांवर खर्च केलेले लाखो रुपये पाण्यातच गेल्याचे स्पष्ट होत आहे. नदीच्या पात्रातून ठिकठिकाणाहून होणारा वारेमाप, उपसा आणि रखरखत्या उन्हामुळे या नदीचे पात्र कोरडे पडले आहे.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेती