शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यातील वास्तव : प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्रशासनाची कसरत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 01:18 IST

वाशिम : जिल्ह्यातील सिंचन क्षेत्रात वाढ होण्यासह पिण्याच्या पाण्याची समस्या सुटावी म्हणून सुधारित प्रशासकीय मान्यतेनंतर जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेल्या १३ प्रकल्पांची कामे संथगतीने होत आहेत. ही कामे येत्या चार महिन्यांत पूर्ण होणे अपेक्षित आहे; परंतु विविध तांत्रिक अडचणींमुळे या कामांत वारंवार अडथळा येत आहे. त्यामुळे पाटबंधारे विभागाला ही कामे पूर्ण करण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. 

ठळक मुद्देयंदाचा पावसाळाही उलटणार!

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यातील सिंचन क्षेत्रात वाढ होण्यासह पिण्याच्या पाण्याची समस्या सुटावी म्हणून सुधारित प्रशासकीय मान्यतेनंतर जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेल्या १३ प्रकल्पांची कामे संथगतीने होत आहेत. ही कामे येत्या चार महिन्यांत पूर्ण होणे अपेक्षित आहे; परंतु विविध तांत्रिक अडचणींमुळे या कामांत वारंवार अडथळा येत आहे. त्यामुळे पाटबंधारे विभागाला ही कामे पूर्ण करण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. जिल्ह्यातील सिंचन क्षेत्रात वाढ होण्याच्या उद्देशाने जलसंधारण विभागाच्यावतीने काही वर्षांपूर्वी जिल्ह्यात २0 हून अधिक प्रकल्पांना मंजुरी दिली होती. त्यासाठी संबंधित विभागाच्यावतीने भूसंपादन प्रक्रिया राबविण्यात आली. या प्रक्रियेला तांत्रिक अडचणींमुळे विलंब लागला. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर काही प्रकल्पांचे काम सुरू झाले, तर उर्वरितपैकी तीन प्रकल्पांच्या कामांत वन जमिनीच्या संपादनाचा अडथळा निर्माण झाला. अखेर यातील दोन प्रकल्पांना पूर्णत: मान्यता मिळाली. त्याशिवाय  प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यापूर्वी काही प्रकल्प सुधारित प्रशासकीय मान्यतेच्या कचाट्यात अडकले. अखेर या प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली. यामध्ये कुकसा, मिर्झापूर, सुरकंडी, वडगाव, वाकद, पळसखेड, इंगलवाडी, पंचाळा, पांगराबंदी, स्वासीन, वाडी रायताळ, वारा जहागिर आणि शेलगाव प्रकल्पाचा समावेश आहे. त्यापैकी सुरकंडी आणि वडगाव प्रकल्पात पाणीसाठा करून सिंचनासाठी त्याचा वापरही होत असून, या प्रकल्पांचे किरकोळ काम उरले आहे. तथापि, उर्वरित ११ प्रकल्पांचे काम अद्याप बरेच पूर्ण होणे बाकी आहे. त्यामुळे ज्या उद्देशाने या प्रकल्पांची उभारणी सुरू केली तो उद्देश अद्यापही सफल होऊ शकला नाही. प्रशासन हे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी कसरत करीत असले तरी, कामे करताना प्रत्यक्ष येणार्‍या अडचणी आणि कामाचा वेग यामुळे हे प्रकल्प पूर्ण होण्यास बराच विलंब लागत आहे. हे ११ प्रकल्प येत्या पावसाळय़ापूर्वी पूर्ण झाल्यास संबंधित गावांतील शेतकर्‍यांना सिंचनाचा प्रश्न सुटून पाणी समस्येवर मात करणे शक्य होणार आहे. 

टॅग्स :washimवाशिम