लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात दुचाकीस्वार हेल्मेटचा तर चारचाकी वाहनचालक हे वाहन सीट बेल्टचा नियमित वापर करीत नसल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. यापुढे मात्र ‘हेल्मेट’ आणि ‘सीट बेल्ट’चा वापर न करणाºयांविरूद्ध धडक कारवाई केली जाणार आहे. यात शासकीय कर्मचाºयांवर विशेष ‘वॉच’ असणार आहे, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे यांनी मंगळवार, ५ फेब्रुवारीला दिली.३० व्या रस्ता सुरक्षा सप्ताहांतर्गत परिवहन विभाग, जिल्हा वाहतूक शाखा आणि शहर वाहतूक शाखेच्या संयुक्त वतीने ४ फेब्रुवारीपासून जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांसमोर शासकीय अधिकारी, कर्मचाºयांची हेल्मेट, सीट बेल्ट व अन्य कागदपत्रांची विशेष तपासणी मोहीम राबवून संबंधितांवर मोटार वाहन कायद्यांतर्गत कारवाई करण्याच्या मोहिमेस सुरूवात झाली आहे. त्यानुषंगाने युद्धस्तरावर जनजागृती केली जात आहे. वाहनधारकांनीही नियमांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन दुतोंडे यांनी केले आहे. नियम पाळा; अपघात टाळा!दुचाकी वाहनावर दोनपेक्षा अधिक व्यक्तींनी प्रवास करू नये, मोटारसायकल चालविताना हेल्मेटचा वापर करावा व मोबाईलवर बोलू नये, समोरच्या वाहनास नेहमी उजव्या बाजूनेच ‘ओव्हरटेक’ करावे. वाहनांची कागदपत्रे नेहमी सोबत ठेवावी, वाहन धोकादायक पद्धतीने किंवा वेडेवाकडे चालवून पुढे घुसण्याचा प्रयत्न करू नका, मोटारसायकल भरधाव वेगाने चालवू नका. थोडक्यात अपघात टाळण्यासाठी घालून दिलेल्या नियमांचे तंतोतंत पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
‘हेल्मेट, सीट बेल्ट’चा वापर न केल्यास कारवाई!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2019 16:26 IST