शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

बालकामगार शोधण्यासाठी कृती दलाच्या आस्थापनांवर धाडी

By दिनेश पठाडे | Updated: December 29, 2023 18:16 IST

जिल्हास्तरीय कृती दलाच्या वतीने सातत्याने बालकामगार शोध मोहीम राबविली जाते.

वाशिम : चहाची टपरी, हॉटेल, छोटे-मोठे कारखाने, किराणा दुकान, चप्पल, कपडे, जनरल स्टोअर्स आदी सारख्या दुकानांमध्ये बालकामगार काम करण्याची शक्यता असते. त्यामुळे या बालकांचे बालपण तर हिरावले जातेच, शिवाय ही मुले शिक्षणापासूनही वंचित राहतात. त्यामुळे बालकामगारविरधोत वेगवान कार्यवाही केली जात आहे. २९ डिसेंबर रोजी वाशिम शहरात आस्थापनांवर धाडी टाकण्यात आल्या. यावेळी बालकामगारांचा शोध तसेच इतर अनुषंगीक बाबींची तपासणी पथकाने केली.

जिल्हास्तरीय कृती दलाच्या वतीने सातत्याने बालकामगार शोध मोहीम राबविली जाते. शुक्रवारी वाशिम शहरातील पाटणी चौक परिसरातील अनेक आस्थापनांना भेटी देऊन तपासणी करण्यात आली. यावेळी एकाही ठिकाणी बालकामगार आढळून आला नाही. त्याशिवाय आस्थापनामालकांनी दुकानाचे नाव सुरुवातीला मराठीत आणि ठळक अक्षरात असणार फलक लावावा, दुकानाचा परवाना, नुतनीकरण यासह इतर बाबींची तपासणी पथकाने केली. हे धाडसत्र कामगार उपआयुक्त नि. पा.पाटणकर यांच्या निर्देशाप्रमाणे जिल्हा सरकारी कामगार अधिकारी आ.शी.राठोड, शॉप इन्स्पेक्टरकिरण राठोड, योगेश गोटे, कर्मचारी धिरज राजगुरू, अतुल ढेले, लक्ष्मण आडे, पोलिस कर्मचारी संदीप वाकुडकर, चाईल्ड लाईन चे शाहिद खान, विस्तार अधिकारी सुरेश उगले यांच्या पथकाने धाडसत्र राबविले.

११ महिन्यांत ९३ आस्थापनांची पाहणी जिल्हा कृती दलाने जानेवारी २०२३ ते आतापर्यंत एकूण ६ धाडसत्र राबविले. यामध्ये एकूण ९३ आस्थापनांना भेटी देण्यात आली. त्यावर एकही बालकामगार आढळून आला नसल्याची माहिती कामगार विभागाकडून देण्यात आली. प्रत्येक आस्थापनावर येथे बालकामगार काम करीत नाही अशा आशयाचे स्टीकर चिटकविण्यात आले. बालकामगार आढळून आल्यास गुन्हा दाखल केला जाईल, असा इशारा भेटी दरम्यान आस्थापनधारकांना देण्यात आला.

टॅग्स :washimवाशिम