शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

वाशिममध्ये नियंत्रण रेषेबाहेरील वाहनांवर धडक कारवाई!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2018 14:48 IST

वाशिम : महाराष्ट्र नगर पालिका अधिनियम १९६५ मधील कलम १०८ (अ) मधील तरतुदीनुसार वाशिम शहरात बुधवार, १० आॅक्टोबरपासून ‘नो पर्किंग’ नियमाच्या अंमलबजावणीस प्रारंभ झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : महाराष्ट्र नगर पालिका अधिनियम १९६५ मधील कलम १०८ (अ) मधील तरतुदीनुसार वाशिम शहरात बुधवार, १० आॅक्टोबरपासून ‘नो पर्किंग’ नियमाच्या अंमलबजावणीस प्रारंभ झाला आहे. त्यानुषंगाने शहरातील मुख्य मार्ग, रहदारीची ठिकाणे व प्रमुख बाजारपेठेत दुचाकी वाहने उभी करण्यासाठी नियंत्रण रेषा आखून देण्यात आल्या असून त्याचे उल्लंघन करणाºया वाहनधारकांविरूद्ध पहिल्याच दिवशी धडक कारवाई करण्यात आली.वाशिम हे जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण असून जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक, जिल्हा परिषद यासह अन्य मुख्य कार्यालये शहरात वसलेली असल्याने विविध स्वरूपातील कार्यालयीन कामे व बाजारपेठेशी निगडित अन्य कामानिमित्त वाशिम शहराशी परिसरातील सुमारे १०० गावांचा दैनंदिन संबंध येतो. त्यामुळे याठिकाणी कायम नागरिकांची, वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. असे असताना मुख्य रस्त्यांवर मन मानेल त्या पद्धतीने वाहने उभी केली जायची. ही बाब लक्षात घेवून नगर परिषदेने ‘नो-पार्किंग’ची चोख अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेऊन त्याचा कंत्राट संबंधित अभिकर्त्यांना देण्यात आला आहे. दरम्यान, ‘नो-पार्किंग’ नियमाची अंमलबजावणी १० आॅक्टोबरपासून सुरू झाली आहे. शहरातील वाहतूक सुरळित राहण्याकरिता जुना गुरांचा बाजार येथील व्यापारी संकुलातील पार्किंगची खुली जागा, महात्मा फुले व्यापारी संकुलातील पार्किंगची खुली जागा आणि दिघेवाडी चौक, आंबेडकर चौक, पोलिस स्टेशन चौक, आंबेडकर चौक, पाटणी चौक, शिवाजी चौक, बालू चौक, गोपाल टॉकीज, जुना रिसोड नाका, अकोला नाका आदीठिकाणी ‘नो पार्किंग झोन’ असणार आहे. ठरवून दिलेल्या नियंत्रण रेषेच्या बाहेर वाहन आढळून आल्यास दंडात्मक कार्यवाही केली जाईल. वाहनधारकांनी या मोहिमेस सहकार्य करावे, असे आवाहन नगर परिषदेकडून करण्यात आले आहे.

टॅग्स :washimवाशिमRto officeआरटीओ ऑफीस