कृषी उत्पन्न बाजार समिती सचिव नीलेश भाकरे यांनी पोलिसांत दाखल केलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की, अडतदार पवन भगत, कारंजा व रवी इंगोले, कारंजा या दोघांनी संगनमत करून शेतकऱ्यांकडून मार्च, एप्रिल व मे महिन्यांत चना, तूर, गहू हा शेतमाल जास्त दराने देण्याचे तोंडी व्यवहार करून शेतमाल खरेदी केला. शेतकऱ्यांना मालाचे वजन, दर व एकूण किमतीची पावती नंतर देतो, असे सांगितले; मात्र आजपर्यंत पैसे दिले नाही. काही शेतकऱ्यांना स्टेट बँक ऑफ इंडियाचे धनादेश दिले. ते देखील अनादरित झाले. आता आरोपींनी फोन बंद करून ठेवला. अशा फिर्यादीवरून पवन भगतविरुद्ध कलम ४२० व ३४ भादंविअन्वये गुन्हा दाखल करून आरोपीस अटक करण्यात आली. पुढील तपास शहर ठाणेदार आधारसिंग सोनोने करीत आहेत.
फसवणूकप्रकरणी आरोपीस अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:43 IST