शहरं
Join us  
Trending Stories
1
Sindhudurg: शिरोडा वेळागर समुद्रात आठ पर्यटक बेपत्ता, तिघांचे मृतदेह सापडले
2
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
3
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
4
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
5
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
6
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
7
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
8
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
9
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
11
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
12
बेडरूममध्ये कॅमेरा बसवून खासगी व्हिडीओ काढले अन् परदेशात...; पत्नीने समोर आलं पतीचे किळसवाणं कृत्य
13
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
14
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
15
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
16
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
17
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
18
भारीच! महागडे प्रोडक्ट सोडा... गळणाऱ्या केसांवर रामबाण उपाय; एकदा करून बघाच
19
“मुंबईच्या गरब्यात सेलिब्रिटींवर लाखोंची उधळण, तेच पैसे शेतऱ्यांना दिले असते”: रोहित पाटील
20
Video: अमानवीय! आधी टक्कर मारली, मग गाडीखाली चिरडले; बैलाची अतिशय क्रुर हत्या...

लेखाविषयक कामकाज खोळंबले!

By admin | Updated: March 19, 2017 02:34 IST

जिल्हा परिषद लेखा संवर्गातील कर्मचा-यांच्या आंदोलनात तोडगा नाही!

वाशिम, दि. १८- विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी जिल्हा परिषद लेखा संवर्गीय कर्मचार्‍यांनी १५ मार्चपासून पुकारलेले लेखणी बंद आंदोलन अद्याप सुरूच असल्याने जिल्हा परिषदेचे लेखाविषयक कामकाज ठप्प पडले आहे. ऐन 'मार्च एन्डिंग'मध्ये लेखा कर्मचार्‍यांची 'लेखणी'बंद झाल्याचा फटका प्रशासकीय कामकाजाला मोठय़ा प्रमाणात बसत आहे.लेखा कर्मचार्‍यांना राज्य शासनाच्या कर्मचार्‍यांप्रमाणे ग्रेड पे वरिष्ठ सहायक लेखा कर्मचार्‍यांना ४00 रुपये व सहायक लेखा अधिकारी यांना १00 रुपये वाढवून मिळावा, ग्रेड पे राज्य शासन कर्मचार्‍यांना ज्या दिनांकापासून मंजूर करण्यात आला, त्या दिनांकापासून मंजूर करण्यात यावा व यात झालेला भेदभाव संपुष्टात आणावा, जिल्हा कोषागार व उपकोषागार कार्यालयाप्रमाणे गट स्तरावर लेखा विभागाचे कामकाज करण्यात यावे, गट स्तरावर सहायक लेखाधिकारी यांना विशेष वित्तीय अधिकार देण्यात यावे, पंचायत समिती स्तरावर लेखा अधिकारी वर्ग-२ चे पद निर्माण करणे आदी मागण्या शासन स्तरावर करण्यात आल्या आहेत. मात्र, अद्यापही सकारात्मक निर्णय न झाल्याने राज्य स्तरावर विविध टप्प्यात आंदोलन केले जात आहे. पहिल्या टप्प्यात १0 ते १४ मार्चदरम्यान काळ्या फिती लावून कामकाज करण्यात आले. दुसर्‍या टप्प्यात १५ मार्चपासून कार्यालयात उपस्थित राहून लेखणी बंद आंदोलनाला सुरुवात केली आहे. अद्याप या आंदोलनावर तोडगा निघाला नसल्याने आंदोलन सुरूच आहे. यामुळे जिल्हा परिषदेचे लेखाविषयक कामकाज ठप्प पडले आहे. दरम्यान, या आंदोलनाला जिल्हा परिषदेच्या सर्व कर्मचारी संघटनांनी पाठिंबा दिला असून, लेखा संवर्गातील सर्व कर्मचारी सहभागी असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लेखा कर्मचारी संघटना जिल्हा शाखा वाशिमचे अध्यक्ष रामानंद ढंगारे यांनी दिली. लेखा कर्मचारी संघटनेच्या या आंदोलनाला जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा दिलीप देशमुख, सभापती सुधीर पाटील गोळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद कापडे, योगेश जवादे, महेश पाटील, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता नीलेश राठोड आदींनी भेट देऊन चर्चा केली.