शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

घरकुलाच्या बांधकामानुसार मिळणार ‘अभियंत्यांना’ मानधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 15:24 IST

वाशिम : राज्यात प्रधानमंत्री आवास योजना व अन्य गृहनिर्माण योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी बाह्य यंत्रणेकडून १६०० ‘ग्रामीण गृहनिर्माण अभियंते’ उपलब्ध केले जाणार आहेत.

वाशिम : राज्यात प्रधानमंत्री आवास योजना व अन्य गृहनिर्माण योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी बाह्य यंत्रणेकडून १६०० ‘ग्रामीण गृहनिर्माण अभियंते’ उपलब्ध केले जाणार आहेत. या अभियंत्यांना घरकुलाच्या बांधकाम टप्प्यानुसार मानधन मिळणार असून बाह्य यंत्रणांची निवड करण्याचे अधिकारही जि.प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना मिळाले आहेत.ग्रामीण भागात घरकुलासंदर्भात राबविण्यात येणाºया विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी बाह्य यंत्रणेद्वारे राज्यात जवळपास १६०० ‘ग्रामीण गृहनिर्माण अभियंते’ उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. ग्रामविकास विभागाने बाह्य यंत्रणा निवडीचे अधिकार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांना २५ सप्टेंबर रोजीच्या पत्रान्वये बहाल केले असून, जिल्हास्तरावर निवड समिती गठीत करण्याच्या सूचनाही दिल्या. ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यांना घरकुल बांधकामाच्या टप्प्यानुसार मानधन मिळणार आहे. डोंगराळ, दुर्गम व नक्षलग्रस्त भागातील एक घरकुल पूर्ण करण्यासाठी एक हजार रुपये आणि सलग भूप्रदेश व इतर भागातील घरकुल पूर्ण करण्यासाठी ७५० रुपये याप्रमाणे बाह्य यंत्रणेद्वारे टप्पा्निहाय मानधन उपलब्ध करून दिले जाणार आहे.डोंगराळ, दुर्गम व एकात्मिक कृती आराखड्यातील जिल्हे या भागातील नवीन २०० घरकुलांसाठी किंवा प्रगतीपथावरील ८०० घरकुल टप्प्यासाठी एक तसेच सलग भूप्रदेश व इतर भागातील नवीन २५० घरकुलांसाठी किंवा प्रगतीपथावरील एक हजार घरकुल टप्प्यासाठी एक या प्रमाणे राज्यात १६०० ग्रामीण गृहनिमाण अभियंते हे मनुष्यबळ पुरवठा करणाºया बाह्य यंत्रणेद्वारे उपलब्ध करून घेतले जाणार आहेत.यासंदर्भात वाशिम जि.प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना म्हणाले की ग्रामीण विकास विभागाच्या सुचनेनुसार वाशिम जिल्ह्यात अंमलबजावणी केली जाईल.

टॅग्स :washimवाशिमWashim ZPवाशीम जिल्हा परिषद