शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

‘श्री’ विसर्जन मिरवणुक मार्गावरील अडथळे हटविले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2018 13:39 IST

श्रींच्या आगमनाची जय्यत तयारी करण्यात येत असून श्री विसर्जन मिरवणूक मार्गावरील अडथळे हटविण्यात आले आहेत.

ठळक मुद्देवाशिम शहरातून श्रींची विसर्जन मिरवणूक मोठया धुमधडाक्यात काढण्यात येते. या रस्त्यावर मोठया प्रमाणात वृक्ष असल्याने ते मिरवणुकीत अडथळा आणू शकतात. मुख्याधिकारी गणेश शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्षांच्या लोंबकळलेल्या फांदया छाटण्यात आल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम :  येत्या १३ सप्टेंबर रोजी श्री गणेशाची स्थापना होणार आहे. श्रींच्या आगमनाची जय्यत तयारी करण्यात येत असून श्री विसर्जन मिरवणूक मार्गावरील अडथळे हटविण्यात आले आहेत. रस्त्यात येणाºया झाडांच्या फांदया नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाच्यावतिने काढण्यात आल्यात.श्री गणेशाच्या स्वागतासाठी गणेश भक्तासह जिल्हा प्रशासनही तयारीला लागला आहे. दहा दिवस चालणाºया गणेशोत्सवासाठी पोलीस प्रशासनाच्यावतिनेही शहरात शांतता समितीच्या सभा घेवून शांततेत गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. दहा दिवासानंतर वाशिम शहरातून श्रींची विसर्जन मिरवणूक मोठया धुमधडाक्यात काढण्यात येते. या रस्त्यावर मोठया प्रमाणात वृक्ष असल्याने ते मिरवणुकीत अडथळा आणू शकतात. याकरिता नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाच्यावतिने मुख्याधिकारी गणेश शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्षांच्या लोंबकळलेल्या फांदया छाटण्यात आल्या आहेत. तसेच या मार्गाची नगरपालिका प्रशासनाच्यावतिने पाहणी करुन कर्मचाºयांना काही मार्गदर्शक सूचना केल्यात.  आगामी काळात गणेशेत्सव, मोहरम उत्साहात साजर केल्या जाणार आहेत. या उत्सवादरम्यान कोणत्याच प्रकारचा अडथळा निर्माण होवू नये, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होण्यासाठी कारणीभूत घटकांची पाहणी करुन तातडीने निवाडा करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिल्या होत्या.  त्यानुसार नगरपालिका प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापन व अग्निमशन दलाच्या चमुने झाडांच्या फांदया झाटल्यात.मिरवणूक मार्गावरील खड्डे बुजविण्याची मागणीश्री विसर्जन मिरवणुकीत कोणत्याच प्रकारचा अडथळा निर्माण होवू नये म्हणून रस्त्यात असलेल्या झाडांच्या  फांदया छाटण्याचे कार्य नगरपालिकेच्यावतिने सुरु करण्यात आले आहे. या रस्त्यावर पडलेल्या खड्डयांबाबतही उपाय योजना करण्याची मागणी नागरिकांतून केली  जात आहे. दरवर्षी श्री मिरवणुकीमध्ये या खड्डयांचा गणेश मंडळांना खूप त्रास सहन करावा लागतोय. गतवर्षी श्री मिरवणूक मार्गावरील खड्डयांची दुरुस्ती करण्यात आली होती. याहीवर्षी ती करण्यात यावी अशी मागणी नागरिकांतून केल्या जात आहे.नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गणेश शेटे, नगराध्यक्ष अशोक हेडा यांनी या रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासंदर्भात उपाय योजना करण्यचे मत नागरिकांत व्यक्त केली जात आहे.श्री विसर्जन मिरवणुकीसह ईतर सणानिमित्त नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होवू नये याबाबत काळजी घेतल्या जात आहे. जिल्हाधिकारी यांनी आढावा सभेत दिलेल्या सुचनांचे पालन करुन ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. नागरिकांनी यात सहकार्य करावे व सर्व सण उतसाहात साजरे करावे.               - गणेश शेटे,मुख्याधिकारी, नगरपरिषद वाशिम

टॅग्स :washimवाशिमGanpati Festivalगणेशोत्सवWashim Nagarpalikaवाशिम नगरपालिका