शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाचे वऱ्हाड घेउन जाणाऱ्या वाहनाचा अपघातात ३२ जण जखमी

By नंदकिशोर नारे | Updated: April 20, 2024 17:04 IST

या अपघातात ३२ जण जखमी झाले असून यापैकी १६ जणांना वाशीम येथील जिल्हा रुग्णालयात रेफर केले आहे.

नंदकिशोर नारे, वाशिम : दिग्रस तालुक्यातील कोलुरा येथील लग्नाचे वऱ्हाड एका वाहनात मानोरा तालुक्यातील अजणी येथे घेऊन जात असताना वापटा घाटात वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने  २० एप्रिल रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास पलटी झाले. त्यात ३२ जण जखमी झाले असून यापैकी १६ जणांना वाशीम येथील जिल्हा रुग्णालयात रेफर केले आहे. त्यात चार जण गंभीर असल्याची माहिती आहे.

कोलुरा येथील हिरामण डहाने यांच्या मुलाचे लग्न अजणी येथे आज होते. सकाळी वऱ्हाड घेऊन टाटा ४०७ हे वाहन निघाले होते.  मानोरा येथून कारंजा रस्त्यावरील अजनी येथे जात असताना वापटा घाटात वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने कठड्याला धडकले आणि पलटी झाले. ही घटना घडताच रोड वरून जात असलेल्या लोकांनी मदत करून , पोलीसाना, १०८ रुग्ण वाहिकेला फोन करून जखमींना मानोरा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.  तेथील डॉक्टरांनी प्रथिमक उपचार करून गंभीर १६ जखमींना वाशीम येथील जिल्हा रुग्णालयात रेफर केले. यामध्ये प्रवीण भोयर,विशाल बोडखे,किसन डहाने,सुधाकर गावंडे,दीपक बोडखे,विष्णू बोडखे,किसन डहाणे,दादाराव बोडखे,गोविंद भोयर,चरण कुडवे,अतुल भोयर,प्रकाश भुजाडे,गजानन डहाने,दादाराव बोडखे,चंदन डहाने,कृष्णा अगलदरे यांचा समावेश आहे. इतर रुग्णावर मानाेरा येथे उपचार करण्यात येत आहे.

टॅग्स :washimवाशिमAccidentअपघात