शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

२०० विद्यार्थ्यांनी घेतले शाडूच्या मातीपासून गणपती बनविण्याचे प्रशिक्षण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2018 14:46 IST

शिरपूर जैन (वाशिम) : स्थानिक स्व. पुंडलिकराव गवळी महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागाद्वारे शाडूच्या मातीपासून गणपती बनविण्याची प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली. जवळपास   २०० विद्यार्थ्यांनी या प्रशिक्षणाला उत्स्फुर्त हजेरी लावली.

ठळक मुद्देमुर्तीकार यादव इंगळे यांनी शाडूच्या मातीपासून गणपती कसे बनवतात हे सांगितले.प्राचार्य डॉ. डब्ल्यु.के. पोकळे यांनी निसर्ग संवर्धनाचे महत्व सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर जैन (वाशिम) : स्थानिक स्व. पुंडलिकराव गवळी महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागाद्वारे शाडूच्या मातीपासून गणपती बनविण्याची प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली. जवळपास   २०० विद्यार्थ्यांनी या प्रशिक्षणाला उत्स्फुर्त हजेरी लावली.अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डब्ल्यू. के. पोकळे होते. मार्गदर्शक म्हणून मूर्तिकार राजेश खंदारकर, मूर्तिकार यादव इंगळे उपस्थित होते. यावेळी रासेयो क्षेत्रीय समन्वयक सतीश चंद्रशेखर, शिवमंगल गौर, श्रीकृष्णराय कोकीळवार, डॉ.अश्विन काटेकर, प्रकाश बोबडे यांची उपस्थिती होती. कार्यशाळा आयोजन समितीेचे समन्वयक वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ.सिमित रोकडे यांनी प्रास्ताविकातून कार्यशाळा आयोजनाचा उद्देश विषद केला. डॉ. अश्विन काटेकर यांनी निसर्ग जगला तरच आपण जगू असे सांगून विद्यार्थ्यांना निसर्ग संवर्धनासाठी या कार्यशाळेचे महत्व पटवून दिले. मुर्तीकार राजेश खंदारकर यांनी इतर प्रकारची माती व शाडूची माती यामधील फरक सांगितला व मातीच्या गणपतीचे निसर्ग संवर्धनासाठी महत्व विषद केले. मुर्तीकार यादव इंगळे यांनी शाडूच्या मातीपासून गणपती कसे बनवतात हे सांगितले. प्राचार्य डॉ. डब्ल्यु.के. पोकळे यांनी निसर्ग संवर्धनाचे महत्व सांगितले.राजेश खंदारकर, यादव इंगळे यांनी गणपतीची मुर्ती बनविण्याचे प्रात्यक्षिक करून दाखविले.  त्यानंतर विद्यार्थ्यांकडून सुद्धा हेच प्रात्यक्षिक करून घेतले. कार्यशाळेमध्ये २०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून मातीपासून गणपतीच्या मुर्ती बनविल्या. कार्यशाळेच्या अंतिम टप्यात सर्वांनी निसर्ग संवर्धनात जास्तीत जास्त हातभार लावण्याची शपथ घेतली संचालन सहायक प्राध्यापक वरुणकुमार लोहीाय यांनी तर आभार सहायक प्राध्यापक डॉ.स्मिता लांडे यांनी मानले. कार्यशाळेच्या यशस्वितेसाठी प्रा. डॉ.सिमित रोकडे, रासेयो कार्यक्रम अधिकारी वरूणकुमार लोहीया, प्रा. श्रीकांत कलाने, डॉ.स्मिता लांडे, डॉ.योगेश साखरे, डॉ.जया सोमटकर यांनी परिश्रम घेतले.

टॅग्स :washimवाशिमganpatiगणपती