शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

अभिनव आंदोलन: नोकरीपासून वंचित अंध युवकाने मागितला दारू विक्रीचा परवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 13:49 IST

मानोरा: दोन्ही डोळ्यांनी अंध असलेल्या युवकाला पात्रतेनुसार शासकीय नोकरीत सामावून घेण्यात आले नाही. प्रामाणिकपणे रोजगाराची इच्छा असतानाही ती पूर्ण होत नसल्याने या युवकाने आता थेट देशी, विदेशी दारू विक्रीचा परवानाच शासनाकडे निवेदनाद्वारे मागितला आहे.

ठळक मुद्देबाळू गुलाब आडे हा युवक दोन्ही डोळ्यांनी अंध असून, त्याने नोकरी मिळविण्यासाठी प्रशासनाचे वारंवार उंबरठे झिजविले.शासन, प्रशासन मात्र त्याची दखल घेत नसल्याने हा युवक हताश झाला आहे.या युवकाने देशी, विदेशी दारू विकण्याचा अर्थात कोणालाही आवडणार नाही, असा मार्ग पत्करण्याचाच निर्णय घेतला आहे.

मानोरा: दोन्ही डोळ्यांनी अंध असलेल्या युवकाला पात्रतेनुसार शासकीय नोकरीत सामावून घेण्यात आले नाही. प्रामाणिकपणे रोजगाराची इच्छा असतानाही ती पूर्ण होत नसल्याने या युवकाने आता थेट देशी, विदेशी दारू विक्रीचा परवानाच शासनाकडे निवेदनाद्वारे मागितला आहे. मानोरा तालुक्यातील भोयणी येथील बाळू आडे या युवकाने हे निवेदन पाठविले असून, परवाना मिळाला नाही तरी, भोयणी येथे दारू विकून पोट भरो आंदोलन करण्याचा इशारा त्याने दिला आहे. भोयणी येथील बाळू गुलाब आडे हा युवक दोन्ही डोळ्यांनी अंध असून, त्याने पात्रतेनुसार नोकरी मिळविण्यासाठी प्रशासनाचे वारंवार उंबरठे झिजविले. तथापि, त्याच्या पदरी निराशेशिवाय काहीच आले नाही. अंध असतानाही प्रामाणिकपणे नोकरी करून पोट भरण्याचा मानस या युवकाचा आहे. तथापि, शासन, प्रशासन मात्र त्याची दखल घेत नसल्याने हा युवक हताश झाला आहे. अंध असल्याने पोट भरण्यासाठी मोलमजुरी करता येणार नाही आणि कोणी कामही देणार नाही. त्यामुळे या युवकाने देशी, विदेशी दारू विकण्याचा अर्थात कोणालाही आवडणार नाही, असा मार्ग पत्करण्याचाच निर्णय घेतला आहे. त्यासाठी त्याने मानोरा पोलीस स्टेशनच्या ठाणेदारांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या मंत्र्यांना रितसर निवेदन पाठवून दारूविक्रीच्या दुकानाचा परवाना देण्याची मागणी केली आहे. त्याची दखल न घेतल्यास १ मेपासून अर्थात महाराष्ट्र दिनापासून भोयणी फाट्यावर देशी, विदेशी दारू विकून पोट भरो आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे. या निवेदनाच्या प्रती गृहविभागाचे प्रधान सचिव, राज्य उत्पादन शुल्क आयुक्त, विभागीय आयुक्त अमरावती, जिल्हाधिकारी वाशिम, पोलीस अधिक्षक वाशिम, राज्य उत्पादन शुल्क अधिक्षक वाशिम आणि उपविभागीय पोलीस अधिकारी कारंजा यांच्याकडेही देण्यात आल्या आहेत.

टॅग्स :washimवाशिमManoraमानोरा