शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

अंगावर वीज पडल्याने १५ वर्षीय मुलीचा मृत्यू

By नंदकिशोर नारे | Updated: October 6, 2022 13:28 IST

घटना ५ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली.

वाशिम : आपल्या घरी भुलाबाई मांडून कोजागिरीपर्यंत सन साजरा करण्यासाठी बाजारामधून भुलाबाई घेऊन येत असताना १५ वर्षीय मुलीच्या अंगावर वीज पडली. यामध्ये तिचा जागीच मृत्यू झाला. ज्योती महादेव बनसोडे (रा. सेलू रोड, वाशिम) असे मृत मुलीचे नाव असून तिचा भाऊ करण हा किरकोळ जखमी झाला आहे. ही घटना ५ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ७ वाजताच्या सुमारास रेल्वे उड्डाण पुलाजवळ घडली.

भूलाबाईचा उत्सव साजरा करण्याचे ज्योती हिने स्वप्न रंगविले होते. त्यासाठी तिने शहरांमधून भुलाबाई खरेदी केली व लहान भाऊ करण याचे सोबत परत आपल्या घरी सायकलने जात होती. संध्याकाळच्या वेळी सगळीकडे विजेचा प्रंचंड कडकडाट सुरू होता. दरम्यान रेल्वे उड्डाण पुलावर चढाचा रस्ता असल्याने दोघे बहिण भाऊ सायकल हातात घेऊन पायी पुल चढत होते.

ज्योती हीचे जवळ सायकल होती तर करण हा सायकलच्या मागे भुलाबाई हातात घेऊन चालत होता. पुलावर पायी चालत असतानाच ज्योतीच्या अंगावर वीज पडली. त्यात तिचा जागीच मृत्यू झाला. तिचा भाऊ करण हा काही अंतरावर असल्याने त्याला किरकोळ जखम झाली. ज्योती ही कळंबा येथील धानोरकर विद्यालयात दहावीत शिकत होती. तिचे वडील महादेव बनसोडे बस स्थानकवर असलेल्या हॉटेलवर मजुरीचे काम करतात. तिची आई भाजीपाला विकून कुटुंबाला आधार देते. या घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त केल्या जात आहे.

टॅग्स :washimवाशिम