शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना लसीकरणासाठी वाशिम जिल्ह्यात ९४९ ‘व्हॅक्सिन कॅरिअर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2021 12:32 IST

Corona Vaccine जिल्ह्यात ९४९ ‘व्हॅक्सिन कॅरिअर’ (लस वाहक डब्बा) उपलब्ध करण्यात आले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम : कोरोना लसीकरणासाठी जिल्ह्यात ९४९ ‘व्हॅक्सिन कॅरिअर’ (लस वाहक डब्बा) उपलब्ध करण्यात आले असून, प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाल्याचे दिसून येते. २०२० मध्ये मार्च महिन्यापासून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढल्याने मे महिन्यापर्यंत लॉकडाऊनची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली. वाशिम जिल्ह्यात ४ एप्रिल रोजी कोरोनाचा शिरकाव झाला. ऑगस्ट व सप्टेंबर या दोन महिन्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढली. त्यानंतर कोरोनाचा आलेख खाली येत असल्याचे दिसून येते. दरम्यान, कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक लस लवकरच उपलब्ध होणार असल्याचे दीड महिन्यांपूर्वीच शासनाने जाहीर केले होते. त्या अनुषंगाने जिल्हा स्तरावर कोरोना लसीकरणाची पूर्वतयारी करण्यात आली. पहिल्या टप्प्यात फ्रंट लाइन वर्कर्स म्हणून सरकारी व खासगी क्षेत्रातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना आणि त्यानंतर ५० वर्षांवरील व अतिजोखमीचे आजार असलेल्या व्यक्तींना लस देण्यात येणार आहे. जिल्ह्यात लस उपलब्ध झाल्यानंतर तालुका स्तरावर आणि तेथून प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर सुरक्षित लस पोहोचविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. एक व्हॅक्सिन व्हॅन, कोल्ड बॉक्स ८३, ‘व्हॅक्सिन कॅरिअर’ ९४९ ची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. ‘व्हॅक्सिन कॅरिअर’द्वारे आवश्यक त्या ठिकाणी सुरक्षित लस पोहोचविण्यात येणार आहे. २५ प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर शीत साखळी केंद्र सुसज्ज ठेवली आहेत. 

कोरोना लसीकरणासाठी जिल्हाधिकारी षण्मुखराजन एस., जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश मोहिते यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यात नियोजन करण्यात येत आहे. ९४९ ‘व्हॅक्सिन कॅरिअर’ निश्चित करण्यात आले आहेत. डॉ. अविनाश आहेरजिल्हा आरोग्य अधिकारी, वाशिम

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसwashimवाशिम