वाशिम : वाशिम शहरातही कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून, २४ एप्रिल रोजी ९२ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे शहरवासीयांची चिंता अधिकच वाढली असून, नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन आरोग्य विभागाने केले.
००००
उन्हाची तीव्रता वाढली ; जलस्रोत कोरडे
वाशिम : यावर्षी मार्च महिन्यापर्यंत गावात पाणीटंचाई जाणवली नाही ; मात्र एप्रिल महिन्यात जलस्रोतांमध्ये घट होत असून भविष्यात गावाला पाणीटंचाई जाणवणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
००००
बाधितांच्या संपर्कातील संदिग्धांची तपासणी
वाशिम : मंगरूळपीर तालुक्यातील शेलुबाजार येथे आणखी नऊ जणांना कोरोना संसर्ग झाल्याचे शनिवारी निष्पन्न झाले. कोरोना बाधितांच्या संपर्कातील संदिग्ध रुग्णांची माहिती घेणे आणि स्वॅब घेण्याची प्रक्रिया आरोग्य विभागातर्फे सुरू आहे.
००००
शासन सेवेत सामावून घेण्याची मागणी
वाशिम : सध्या कोरोना विषाणू संसर्गाचे संकट तीव्र झाले असून आरोग्य विभागात जागा रिक्त आहेत. त्यावर डीएमएलटी धारकांना कायमस्वरुपी म्हणून सामावून घ्यावे, अशी मागणी युवकांनी शुक्रवारी केली.
०००
ग्रामीण भागात सुविधांचा अभाव
वाशिम : काटा, हराळ, शिरपूर, किन्हीराजा, केनवड आदी जिल्हा परिषद गटातील अनेक गावांतील काही दलित वस्तीमध्ये मुलभूत सुविधा उपलब्ध नाहीत. रस्ते, पथदिवे, पाणीपुरवठ्याची सुविधा उपलब्ध करण्याची मागणी होत आहे.
00
अनसिंग येथे आणखी १३ कोरोना रुग्ण
वाशिम : वाशिम तालुक्यातील अनसिंग येथे आणखी १३ जणांचा कोरोना चाचणी अहवाल २४ एप्रिल रोजी पॉझिटिव्ह आला. यापूर्वी देखील अनसिंग येथे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे गावकऱ्यांची चिंता वाढली आहे.
०००
कृषीपंप जोडणी देण्याची मागणी
वाशिम : कृषीपंप जोडणीसाठी रिसोड तालुक्यातील जवळपास ५०० शेतकऱ्यांनी महावितरणकडे अर्ज दिले होते. यापैकी जवळपास २०० शेतकऱ्यांना अद्याप कृषीपंप जोडणी मिळाली नाही. याकडे संबंधितांनी लक्ष देण्याची होत आहे.
००००
जऊळका येथे आणखी एक बाधित
वाशिम : मालेगाव तालुक्यातील जऊळका रेल्वे येथील आणखी एका जणाचा कोरोना चाचणी अहवाल २४ एप्रिलला पॉझिटिव्ह आल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे. जऊळका परिसरात दररोज रुग्ण आढळून येत आहेत.
०००००
पुरेशा प्रमाणात पीपीई किट उपलब्ध
वाशिम : जिल्ह्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयासह कोविड केअर सेंटरमध्ये कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी आणखी काही पीपीई किट जिल्ह्याला उपलब्ध झाल्या आहेत. संबंधित केंद्रांवर त्याचे वितरण केले जात आहे.