शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील ९ हजार मजुरांना मिळाले गावातच काम; ग्रामीण भागात विविध यंत्रणेची १३९० कामे सुरु

By दिनेश पठाडे | Updated: June 18, 2023 17:01 IST

विशेष म्हणजे, १०० दिवसांपर्यंत रोजगाराचे काम मजुरांना मिळते.

वाशिम : उन्हाळ्यात कामाच्या शोधात मजुरांची होणारे स्थलांतर थांबावे यासाठी गावातच काम सुरु करुन ९ हजारांना मजुरांना गावातच काम उपलब्ध करण्यात आले आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत मजुरांना गावातच काम मिळावे, त्यांचे स्थलांतर थांबावे सोबतच विविध विकासात्मक कामे मार्गी लागावीत, या हेतूने योजना राबविली जाते. यामुळे अकुशल लाभार्थ्यांना गावातच रोजगार मिळतो.

विशेष म्हणजे, १०० दिवसांपर्यंत रोजगाराचे काम मजुरांना मिळते. योजनेचे संपूर्ण कामकाज हे संगणकीकृत असून, लाभार्थ्यांच्या बँक खात्यात मजुरीची रक्कम जमा होते. बोगसगिरीला चाप बसावा, गरजू मजुरांना रोजगार उपलब्ध व्हावा, त्यासाठी  रोजगार हमी योजनेच्या कार्यपद्धतीत बदल केले जात आहेत. सार्वजनिक कामावरील मजुरांच्या हजेरीसाठी ऑनलाइन प्रणाली विकसित करण्यात आली आहे, तसेच जॉबकार्डधारकांचे आधार लिंक करण्यात आले. यासह इतर उपाययोजना राबविल्या जात आहेत.

ग्रामीण भागातील मजुरांना हवे ते काम योजनेंतर्गत उपलब्ध केले जाते. ग्रामीण भागात उन्हाळ्यात कामाचा तुटवडा असतो. मजुरांना काम उपलब्ध नसल्याने त्यांना कामाच्या शोधात इतरत्र जावे लागते. त्यामुळे गावातच काम उपलब्ध करुन दिले जाते. यासाठी मजुरांना काम मागणी अर्ज करणे आवश्यक ठरते. मजुरांना काम मिळावे यासाठी मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायत स्तरावर कामे सेल्फवर ठेवण्यात आली आहेत. सध्या जिल्ह्यात विविध यंत्रणेची १३९० कामे सुरु असून त्यावर ९ हजार ८६ मजूर काम हजर असल्याचे रविवारच्या ऑनलाइन मस्टरवरुन पहायला मिळाले.२२९ ग्रामपंचायतीमध्ये विविध कामे

जिल्ह्यातील ४९१ ग्रामपंचायतीपैकी २२९ ग्रामपंचायती अंतर्गत विविध यंत्रणेची  १३९० कामे सुरु आहेत. यामध्ये फळबाग लागवड, सिंचन विहीर, घरकूल, पाणंद रस्ता आदी कामांचा समावेश आहे.

टॅग्स :washimवाशिमEmployeeकर्मचारी