शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात ८८ प्रशासकांनी स्वीकारला ग्रामपंचायतींचा पदभार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2020 17:35 IST

२४ ते २६ आॅगस्टदरम्यान मुदत संपणाºया ८८ ग्रामपंचायतींमध्ये प्रशासकांनी पदभार स्वीकारला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : पाच वर्षांची मुदत संपणाºया जिल्ह्यातील १६३ ग्रामपंचायतींमध्ये २४ आॅगस्ट रोजी प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली. दरम्यान, २४ ते २६ आॅगस्टदरम्यान मुदत संपणाºया ८८ ग्रामपंचायतींमध्ये प्रशासकांनी पदभार स्वीकारला आहे.जिल्ह्यात एकूण ४९१ ग्रामपंचायती असून, यापैकी १६३ ग्रामंपचायतींमधील विद्यमान सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांचा पाच वर्षांचा कालावधी ३१ आॅगस्टपर्यंत संपुष्टात येत आहे. यामध्ये वाशिम तालुक्यातील २४, मालेगाव तालुक्यातील ३०, रिसोड तालुक्यातील ३४, कारंजा तालुक्यातील २८, मंगरूळपीर तालुक्यातील २५, मानोरा तालुक्यातील २२ ग्रामपंचायतींचा समावेश आहे.  कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभूमीवर ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. मुदत संपणाºया ग्रामपंचायतींमध्ये प्रशासक नेमण्याच्या शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील १६३ ग्रामपंचायतींमध्ये प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली. एका प्रशासकाकडे केवळ एकाच ग्रामपंचायतीचा कार्यभार सोपविण्यात आला. दरम्यान, २४ ते २६ आॅगस्ट या दरम्यान ८८ ग्रामपंचायतींची मुदत संपली असून, या ग्रामपंचायतींवर प्रशासकराज सुरू झाला. ८८ प्रशासकांनी ग्रामपंचायतींचा पदभार स्वीकारला आहे. यामध्ये कारंजा तालुक्यातील १५, वाशिम तालुक्यातील १२, रिसोड तालुक्यातील १७, मंगरूळपीर तालुक्यातील १३, मानोरा तालुक्यातील १५, मालेगाव तालुक्यातील १६ ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

टॅग्स :washimवाशिमgram panchayatग्राम पंचायत