शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मुख्य रस्त्यावरील ८५ झाडांची होणार कटाई!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 18:17 IST

नगर परिषदेने शहरातील पाटणी चौक ते अकोला आणि तेथून एका खासगी दवाखान्यापर्यंतची लहान-मोठी अशी ८५ झाडे तोडण्याची तयारी चालविली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : झाडांमुळे विकासकामांना बाधा पोहचत असल्याचा मुद्दा पुढे करून स्थानिक नगर परिषदेने शहरातील पाटणी चौक ते अकोला आणि तेथून एका खासगी दवाखान्यापर्यंतची लहान-मोठी अशी ८५ झाडे तोडण्याची तयारी चालविली आहे. यामुळे मात्र वृक्षप्रेमी नागरिकांमधून पालिका प्रशासनाच्या धोरणाप्रती नाराजीचा सूर उमटत आहे.वृक्षांचे घटते प्रमाण पर्यावरणाचा ºहास होण्यास कारणीभूत ठरत असल्याने शासनस्तरावरून एकीकडे वृक्ष लावा-वृक्ष जगवा, वृक्षवल्ली आम्हा सोयरे, अशा विविध स्वरूपातील घोषणा देवून वृक्षलागवडीला प्राधान्य दिले जात आहे. दुसरीकडे मात्र झाडेच विकासकामांच्या आड येत असल्याचे ठोसपणे सांगत स्थानिक प्रशासनाकडून शासनाच्या संकल्पनेला सुरूंग लावण्याचे काम केले जात असल्याचे दिसून येत आहे. वाशिम शहरातील पाटणी चौक ते अकोला नाका आणि तेथून पुढे एका खासगी दवाखान्यापर्यंत मोठमोठी हिरवीकंच झाडे वाढलेली आहेत. मात्र, ती मुळासकट तोडून घेवून जाण्यासंदर्भात नगर परिषदेने निविदा मागविल्या असून त्या १० सप्टेंबर रोजी उघडून त्यानंतर पात्र कंत्राटदारास झाडे तोडण्याची मंजूरी दिली जाणार आहे. एकूणच या सर्व प्रकारांमुळे मात्र वाशिममधील वृक्षप्रेमी नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. झाडे तोडल्याशिवाय रस्त्यांची कामे सुरू करणे अशक्य आहे. असे असले तरी रस्त्यांची कामे पूर्ण झाल्यानंतर मधोमध विविध प्रजातींची, फुलांची झाडे लावण्यासाठी नगर परिषद पुढाकार घेणार आहे. त्यामुळे या कामास नागरिकांनीही सहकार्य करणे अपेक्षित आहे.- गणेश शेट्टेमुख्याधिकारी, वाशिम नगर परिषद

टॅग्स :washimवाशिमWashim Nagarpalikaवाशिम नगरपालिका