शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
2
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
3
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर
4
मृतांचे क्लेम सेटलमेंट लवकर पूर्ण करणार; अहमदाबाद विमान अपघाताबाबत LIC चा मोठा निर्णय
5
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
6
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
7
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
8
कामाची बातमी! जितके किमी प्रवास, आता तितकाच भरा Toll; कसं काम करणार नवीन टोल पॉलिसी?
9
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
10
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
11
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट', काय आहे याचा अर्थ?
12
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
13
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
14
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
15
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
16
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
17
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
18
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
19
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
20
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;

वाशिम येथे  ८ हजार महिला व मुली एकत्र येऊन साकारणार  ‘बेटी बचाओ’ अभियानाचा लोगो 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 13:45 IST

​​​​​​​वाशिम : जागतिक महिला दिनानिमित्त ८ मार्चला वाशिम येथे ८ हजार ३१८ महिला व मुली एकत्र येऊन ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अभियानाचा लोगो साकारणार आहेत.

ठळक मुद्देमहिला दिनाचे औचित्य साधून ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अभियानाचा लोगो ८ मार्चला सकाळी ७ वाजता शहरातील पोलीस कवायत मैदान येथे साकारला जाणार आहे. हा उपक्रम साकारण्यासाठी पोलीस कवायत मैदान येथे दररोज सकाळच्या सुमारास सराव केला जात आहे. यामध्ये किमान ८,३१८ महिला व मुलींचा सहभाग राहणार आहे.

वाशिम : जागतिक महिला दिनानिमित्त ८ मार्चला वाशिम येथे ८ हजार ३१८ महिला व मुली एकत्र येऊन ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अभियानाचा लोगो साकारणार आहेत. या उपक्रमाचा सराव स्थानिक पोलीस कवायत मैदान येथे केला जात असून, ६ मार्च रोजी प्राथमिक टप्प्यात ‘लोगो’ साकारण्यात आला.

स्त्री-पुरूष लिंगगुणोत्तरातील तफावत दूर करणे, मुलींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे यासह महिला सक्षमीकरणासाठी ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’ अभियान राबविले जात आहे. या अभियानात वाशिम जिल्ह्यात समावेश असून, महिला व बालकल्याण विभागाद्वारे विविध उपक्रम राबवून जनजागृती केली जात आहे. ८ मार्च रोजी जागतिक महिला दिन असून, या दिनाचे औचित्य साधून ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अभियानाचा लोगो ८ मार्चला सकाळी ७ वाजता शहरातील पोलीस कवायत मैदान येथे साकारला जाणार आहे. यामध्ये किमान ८,३१८ महिला व मुलींचा सहभाग राहणार आहे. हा उपक्रम साकारण्यासाठी पोलीस कवायत मैदान येथे दररोज सकाळच्या सुमारास सराव केला जात आहे. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीणा, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडनीस, महिला व बालविकास अधिकारी राठोड, प्रभारी महिला व बालकल्याण अधिकारी प्रमोद कापडे यांच्या मार्गदर्शनात बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानाचे जिल्हा समन्वयक रुपेश निमके व चमू हा लोगो साकारण्यासाठी परिश्रम घेत आहेत. ६ मार्च रोजी सकाळी ९ ते ११ या वेळेत लोगो साकारण्याचा सराव करण्यात आला.

टॅग्स :washimवाशिमpolice parade groundपोलिस कवायत मैदान