शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

पोहरादेवीकडे जाणारे ८ मार्ग २३ मार्च ते ५ एप्रिलपर्यंत बंद 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2020 17:48 IST

पोहरादेवीकडे जाणारे मार्ग २३ मार्च ते ५ एप्रिलदरम्यान बंद करण्याचा आदेश १४ मार्च रोजी काढला आहे.

लोकमत न्युज नेटवर्कवाशिम: जिल्ह्यातील बंजारा समाजाची काशी म्हणून ओळखल्या जाणाºया पोहरादेवी येथे रामनवमीनिमित्त दरवर्षी होणारी यात्रा रद्द करण्यात आली आहे. तथापि, राज्यभरातील भाविक मोठ्या संख्येने येथे दाखल होण्याची शक्यता असून, याद्वारे कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती आहे. या पृष्ठभुमीवर जिल्हाधिकाºयांनी पोहरादेवीकडे जाणारे मार्ग २३ मार्च ते ५ एप्रिलदरम्यान बंद करण्याचा आदेश १४ मार्च रोजी काढला आहे.वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यात असलेले पोहरादेवी संस्थान बंजारा समाजाची काशी म्हणून ओळखल्या जाते. या ठिकाणी दरवर्षी रामनवमीनिमित्त यात्रोत्सवाचे आयोजन केले जाते. या यात्रोत्सवात महाराष्ट्रातील यवतमाळ, अकोला, अमरावती, बुलडाणा, हिंगोली, परभणी, नांदेड आदि जिल्ह्यांतील भाविकांसह आंध्रप्रदेश, कर्नाटक, गुजरात, राजस्थान आदि राज्यांतूनही दोन ते अडीच लाख बंजारा भाविक आपापल्या वाहनाने पोहरादेवी येथे येतात. यात्रोत्सवादरम्यान पोहरादेवीसह नजिकच्याच उमरी खु. येथेही भाविक लो खासगी व ईतर वाहनांनी येतात. ही यात्रा रद्द करण्यात आली असली तरी, बाहेरून येणारी वाहने संत सेवालाल महाराज संस्थान पोहरादेवी येथे आल्यास कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे खबरदारीची उपाय योजना म्हणून संत सेवालाल महाराज संस्थान पोहरादेवी येथे जाणाºया यात्रेकरूंना थांबविण्यासाठी ८ मार्ग बंद करणे आवश्यक आहे. या पृष्ठभुमीवर जिल्हाधिकारी हृषिकेश मोडक यांनी वाशिम मुंबई पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ३३ (१) अन्वये त्यांना प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून पोहरादेवी येथे यात्रेनिमित्त जाणाºया वाहनांच्शा वाहतुकीचे  ८ मार्ग २३ मार्च रोजी सकाळी ९ वाजतापासून ते ५ एप्रिल रोजी रात्री ८ वाजेपर्यंत बंद करण्याचे आदेश दिले आहेत.  बंद करण्यात आलेले मार्ग १) यवतमाळ-दिग्रस-वाईगौळ-पोहरादेवी मार्ग२) पुसद-सिंगद-पोहरादेवी मार्ग३) पुसद-ज्योतीबानगर-सेंदोना-पोहरादेवी मार्ग४) वाशिम-धानोरा-शेंदुरजना-फुलउमरी-पोहरादेवी मार्ग५) मंगरुळपीर-मानोरा-गव्हा-रतनवाडी-पोहरादेवी मार्ग६) कारंजा-मानोरा-पंचाळा फाटा-पोहरादेवी मार्ग७) गवली-फुलउमरी-पोहरादेवी मार्ग८) दारव्हा-बोरव्हा-कुपटा-पोहरादेवी मार्ग

टॅग्स :washimवाशिम