शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात आणखी ८ कोरोना पॉझिटिव्ह; रुग्णसंख्या ३७४ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2020 18:28 IST

आता जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या ३७४ झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. २० जुलै रोजी आठ जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले. आता जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या ३७४ झाली आहे. दरम्यान, २० जुलै रोजी ३६ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.जिल्ह्यातील मेडशी येथे पहिला कोरोनाबाधीत रुग्ण एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आढळला होता. त्यानंतर उत्तरप्रदेशमधील कोरोनाबाधीत ट्रकच्या क्लिनरचा वाशिममध्ये मृत्यू झाला. त्याच ट्रकचा चालक कोरोनाबाधीत असल्याचे निष्पन्न झाले होते. मे महिन्यापर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या नियंत्रित होती. मे महिन्याच्या अखेरीस परराज्य, परजिल्ह्यातून मोठ्या संख्येने नागरीक जिल्ह्यात परतले. बाहेरगावावरून आलेल्या नागरिकांमुळे जून महिन्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येने द्विशतक ओलांडले. सर्दी, ताप, खोकला, घसा दुखणे आदी लक्षणे असणाऱ्या रुग्णांचेदेखील स्वॅब घेण्याची व्यवस्था तालुकास्तरावर कोविड केअर सेंटरमध्ये करण्यात आली. जुलै महिन्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचे दिसून येते. ३६ व्यक्तींचे अहवाल प्राप्त झाले असून यापैकी २८ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आहेत, तर ८ व्यक्तींना कोरोना विषाणू संसर्ग झाल्याचे निदान झाले आहे. या व्यक्ती यापूर्वीच्या बाधिताच्या संपर्कातील आहे. रिसोड शहरातील गजानन महाराज मंदिर परिसरातील १, शिरपूर जैन (ता. मालेगाव) येथील १, इलखी (ता. वाशिम) येथील २, कारंजा लाड शहरातील सिंधी कॅम्प परिसरातील १ व अशोक नगर परिसरातील १, मंगरूळपीर शहरातील काझीपुरा येथील १ व पठाणपुरा येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात कोण, कोण आले याची माहिती आरोग्य विभागातर्फे घेतली जात आहे. दरम्यान, जिल्ह्यात उपचार घेणाºया ३६ व्यक्तींना उपचारानंतर सोमवारी रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामध्ये मालेगाव शहरातील ४, मंगरूळपीर शहरातील ११, कारंजा लाड येथील १० व हिवरा रोहिला (ता. वाशिम) येथील ११ व्यक्तींचा समावेश आहे.

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या