शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
2
मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढणार तर उद्धव ठाकरेंसोबत युतीआधीच मनसेने 'इतक्या' जागांची केली तयारी
3
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना बंद होणार? एकनाथ शिंदेंकडून मोठी घोषणा, e-KYC देखील...
4
धक्कादायक! बाथरूममध्ये आंघोळीसाठी गेली, पण तासभर बाहेर नाही आली; दरवाजा तोडला तर...
5
ब्युटी आणि फॅशन क्षेत्रातील 'हा' शेअर्स ५२ आठवड्यांच्या उच्चांकाजवळ, वर्षात ५७% रिटर्न, अजूनही संधी?
6
२ डॉक्टर अन् मशिदीच्या इमामासह ७ जणांना अटक, 'व्हाइट कॉलर' दहशतवाद्यांचा पर्दाफाश, पोलिसांनी केले धक्कादायक खुलासे
7
कर्मानेच अडकले! करायला गेला एक अन्.. दहशतवादी अकील आणि मुजम्मिल यांचा 'असा' झाला पर्दाफाश!
8
Jalgaon Accident: कार दुभाजकावर धडकून पेटली, पत्नीचा होरपळून मृत्यू, पती गंभीर जखमी 
9
कमाल झाली राव! फोनमध्ये नेटवर्कशिवाय चालणार मॅप, करता येणार मेसेज; 'कसं' ते जाणून घ्या
10
SIP ने केले मालामाल! ५ वर्षांत २९ फंड्सचा २०% हून अधिक परतावा; 'मिड कॅप'ची जबरदस्त कामगिरी
11
Astro Tips: ज्योतिष शास्त्रानुसार, मंगळवारी केस कापल्याने आयुष्य ८ महिने कमी होते? पर्याय काय?
12
मत फुटले तरी लंकेंनी नगरपंचायत राखली! पारनेरच्या नगराध्यक्षपदी डॉ. विद्या कावरे, मविआने उधळला विजयाचा गुलाल
13
'महेंद्र दळवी डोक्यावर पडलेले आमदार'; शिंदेंची शिवसेना-अजित पवारांच्या राष्ट्रवादीत संघर्षाचा भडका
14
आयटी क्षेत्रामुळे सेन्सेक्स आणि निफ्टीची मोठी झेप; पण, टाटा समूहातील 'हा' शेअर भयावह घसरला
15
CSK ‘खिडकी’तून बाहेर काढणार असल्याची चर्चा! त्यातच जड्डू Insta वरून ‘गायब’
16
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
17
५ स्टार सेफ्टी रेटिंग अन् तब्बल ७५००० डिस्काउंट असणारी कार ह्युंदाईने वेबसाईटवरूनच काढून टाकली! विक्रीही बंद होणार?
18
भंगार विक्रीतून सरकार झालं मालमाल; इतक्या कमाईत खरेदी करू शकतात ७ वंदे भारत ट्रेन
19
Video - दारूने भरलेले ग्लास, तळलेले शेंगदाणे... बंगळुरूच्या सेंट्रल जेलमध्ये कैद्यांची जंगी पार्टी
20
सत्य साईबाबा: चमत्कारी जीवन, भक्तांमध्ये दिग्गज सेलिब्रेटी, आजही जगभर अनुयायी; काय होते वैशिष्ट्य?

७५४२६ शेतकऱ्यांनी उतरविला पीक विमा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:28 IST

वाशिम : पिकांचे नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगराईमुळे नुकसान झाल्यास पिकांना संरक्षण म्हणून प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत १४ जुलैपर्यंत ...

वाशिम : पिकांचे नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगराईमुळे नुकसान झाल्यास पिकांना संरक्षण म्हणून प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत १४ जुलैपर्यंत जिल्ह्यातील ७५४२६ शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला आहे. १५ जुलै अंतिम मुदत असून, मुदतवाढ मिळेल की नाही? याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे.

नैसर्गिक आपत्ती, किडीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागते. नुकसानभरपाई मिळावी याकरिता प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत पिकांना संरक्षण देण्यात येते. मात्र, जाचक अटी असल्याचे कारण समोर करून अनेक शेतकरी पीक विमा योजनेकडे पाठ फिरवीत असल्याचे दिसून येत आहे. या योजनेत शेतकऱ्यांचा अधिकाधिक सहभाग लाभावा याकरिता जनजागृती करण्यात आली. अनेक ठिकाणी बँक, सामूहिक सुविधा केंद्र, कृषी केंद्र तसेच ग्रामपंचायतीच्या दर्शनी भागात या योजनेचे पोस्टरही लावण्यात आले. तथापि, शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला नसल्याचे दिसून येते. १४ जुलैपर्यंत ४१७६ कर्जदार आणि ७१२५० बिगर कर्जदार अशा एकूण ७५४२६ शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला आहे. विमा उतरविण्यासाठी १५ जुलै अंतिम मुदत आहे. १५ जुलैनंतर मुदतवाढ मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

000०००

कर्जदार शेतकरी ४१७६

बिगर कर्जदार शेतकरी ७१२५०

विमा संरक्षित क्षेत्र ५५४३९

शेतकऱ्यांची विमा रक्कम ४.८३ कोटी

राज्य सरकारची विमा रक्कम १३.२९ कोटी

केंद्र सरकारची विमा रक्कम १३.२९ कोटी

००००

कोट

प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत १५ जुलैपर्यंत शेतकऱ्यांना पीक विमा उतरविता येणार आहे. १४ जुलैपर्यंत जिल्ह्यातील ७५ हजार ४२६ शेतकऱ्यांनी विमा उतरविला आहे. या योजनेत अधिकाधिक शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे.

- शंकर तोटावार

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वाशिम