वाशिम : उन्हाळय़ाचे दिवस असल्याने घराच्या स्लॅबवर झोपले असताना अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करुन ७४ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना सावरगाव बर्डे येथे १४ मे रोजी घडली. सावरगाव बर्डे येथील प्रथम राजाराम कड (६९) यांचे कुटुंब उन्हाळय़ाचे दिवस असल्याने घराच्या स्लॅबवर झोपायला गेले होते. घरात केवळ त्यांची मुलगी झोपली होती. १४ मे रोजी रात्री १२ ते ६ वाजताच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने जिन्याच्या दरवाजाची कडी उघडून घराच्या आत प्रवेश केला. धान्य ठेवलेले असलेल्या रुममध्ये लोखंडी पत्र्याच्या पेटीचे कुलूप तोडले. त्यामध्ये असलेले ३ तोळे ८ ग्रॅम वजनाचे ७४ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केले. याबाबत प्रथम राजाराम कड यांच्या तक्रारीवरुन ग्रामीण पोलिसांनी अज्ञात आरोपिविरुद्ध ४५७, ३८0 नुसार गुन्हा दाखल केला.
सावरगाव बर्डे येथे ७४ हजाराची चोरी
By admin | Updated: May 15, 2015 00:37 IST