शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात ७१ टंचाईग्रस्त गावांसाठी ७५ विहिरींचे अधिग्रहण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 01:46 IST

वाशिम: गतवर्षीच्या अपुर्‍या पावसामुळे जिल्ह्यात यंदा निर्माण झालेली पाणीटंचाईची समस्या अधिकच तीव्र होत आहे. यावर नियंत्रणासाठी जिल्हा प्रशासनाकडून टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यासह विहिरींचे अधिग्रहणही करण्यात येत आहे. सद्यस्थितीत ७१ गावांसाठी ७५ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले असून, १0 गावांत टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. येत्या काही दिवसांत ही संख्या आवश्यकतेनुसार अधिक वाढणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. 

ठळक मुद्देपाणीटंचाई तीव्र१0 गावांत टँकरने पाणी पुरवठा 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: गतवर्षीच्या अपुर्‍या पावसामुळे जिल्ह्यात यंदा निर्माण झालेली पाणीटंचाईची समस्या अधिकच तीव्र होत आहे. यावर नियंत्रणासाठी जिल्हा प्रशासनाकडून टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यासह विहिरींचे अधिग्रहणही करण्यात येत आहे. सद्यस्थितीत ७१ गावांसाठी ७५ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले असून, १0 गावांत टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. येत्या काही दिवसांत ही संख्या आवश्यकतेनुसार अधिक वाढणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. वाशिम जिल्ह्यात गतवर्षी वार्षिक सरासरीच्या तुलनेत केवळ ८४ टक्के पाऊस पडला. त्यामुळे जलसाठे भरले नाहीत. परिणामी त्यांनी हिवाळय़ातच तळ गाठला. त्यातच भूजल पातळी पावणेदोन मीटरपेक्षा अधिक खालावल्याने कूपनलिका आणि हजारो दैनंदिन वापरातील विहिरीही आटल्याने जिल्हाभरात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली. जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार जिल्ह्यात ५१0 गावांत पाणीटंचाईची समस्या आहे. यातील बहुतांश गावांसाठी स्थानिक पातळीवर पर्यायी उपाययोजना असल्या तरी, काही गावांतील स्थिती विदारक झाली आहे. पाण्यासाठी हाहाकार सुरू आहे. जिल्हा प्रशासनाने ही बाब लक्षात घेऊन जनतेला पाणी पुरवठा करण्यासाठी पर्यायी उपाय योजना आखल्या आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने विहीर अधिग्रहणाचा समावेश असून, अत्यावश्यक बाब म्हणून टँकरचाही आधार घेतला जात आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात ७१ गावांसाठी ७५ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले असून, १0 गावांत टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. पाणीटंचाईची सर्वाधिक झळ वाशिम तालुक्याला बसत असल्याचे दिसत आहे. खबरदारी म्हणून प्रशासनाने इतरही उपाय योजनांची तयारी केली आहे.  

टँकरची संख्या वाढण्याची शक्यता सद्यस्थितीत जिल्ह्यात विहिरींच्या अधिग्रहणावर भर देण्यात येत असला तरी, विहिरींअभावी पाणीटंचाईचा सामना करणार्‍या गावांसाठी टँकरनेही पाणी पुरवठा करण्यात येत आहे. जिल्ह्यात सध्या १0 टँकर सुरू करण्यात आले आहेत. यामध्ये मानोरा तालुक्यात सर्वाधिक ४, तर कारंजा, वाशिम आणि मालेगाव तालुक्यात प्रत्येकी दोन टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. अद्याप रिसोड आणि मंगरुळपीर तालुक्यात टँकरची गरज भासली नाही; परंतु येत्या काही दिवसांत पाणीटंचाई तीव्र होण्याची दाट शक्यता असल्याने टँकरच्या संख्येतही वाढ होणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे. 

टॅग्स :washimवाशिमwater scarcityपाणी टंचाई