शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सीबीएसई बारावीचे ७१ विद्यार्थी परीक्षा न देताच उत्तीर्ण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 11:53 IST

71 students of CBSE XII pass without giving exams: जिल्ह्यातील दोन शाळांमधील ७१ विद्यार्थी परीक्षा न देताच उत्तीर्ण होणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कोरोनामुळे यंदा दहावीप्रमाणेच सीबीएसई बारावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवार, १ जून रोजी जाहीर केला. या निर्णयानुसार जिल्ह्यातील दोन शाळांमधील ७१ विद्यार्थी परीक्षा न देताच उत्तीर्ण होणार आहेत. दरम्यान, पुढील प्रवेश नेमक्या कोणत्या आधारावर होतील, याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागून आहे.कोरोनामुळे गत दीड वर्षांपासून शिक्षण क्षेत्र प्रभावित झाले आहे. गतवर्षी पहिली ते नववीच्या परीक्षा रद्द केल्या होत्या. यंदाही पहिली ते नववीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. कोरोना विषाणू संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, सीबीएसई बोर्डाने यापूर्वी इयत्ता दहावीची परीक्षादेखील रद्द केली. याच धर्तीवर राज्याच्या शालेय शिक्षण विभागानेदेखील दहावीची बोर्डाची परीक्षा रद्द केली. दुसरी लाट ओसरत असली, तरी धोका अजून कायम आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदा सीबीएसई बारावीची परीक्षादेखील रद्द करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी आयोजित केलेल्या बैठकीला घेतला. मुलांच्या सुरक्षिततेला सर्वाधिक प्राधान्य असेल, असे सांगून या कठीण प्रसंगात त्यांना परीक्षेचा ताण देणे उचित ठरणार नाही. बारावीचा निकाल निश्चित केलेल्या कालावधीत योग्य पद्धतीने मूल्यमापनाच्याआधारे जाहीर केला जाईल, असेही पंतप्रधानांनी स्पष्ट केले. या निर्णयानुसार जिल्ह्यातील जवाहर नवोदय विद्यालय आणि भावना पब्लिक स्कूल या दोन शाळेतील ७१ विद्यार्थी हे परीक्षा न देताच उत्तीर्ण होणार आहेत.

पुढील प्रवेशाचे काय होणार?विद्यार्थ्यांच्या आयुष्यात ‘टर्निंग पॉईंट’ असणाऱ्या सीबीएसई बारावीची   परीक्षा रद्द करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केला. बारावीनंतरचे वैद्यकीय, अभियांत्रिकी व अन्य शाखेचे प्रवेश नेमक्या कोणत्या आधारे केले जातील, सीईटी परीक्षेचे स्वरूप कसे राहील, हे अद्याप निश्चित नाही. पुढील प्रवेश प्रक्रियेचे काय? असा प्रश्न विद्यार्थ्यांकडून उपस्थित केला जात आहे.

सीबीएसई बारावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केला. पुढील प्रवेशासाठी सीईटी घेतली जाईल. ऑनलाइन किंवा ऑफलाईन पद्धतीने सीईटी घ्यावयाची, याचा निर्णय कोरोना परिस्थिती पाहून वरिष्ठ स्तरावर होऊ शकतो, असा अंदाज आहे.- आर.जे. चंदनशीवशिक्षण तज्ज्ञ तथा प्राचार्य नवोदय विद्यालय, वाशिम.

टॅग्स :washimवाशिमCBSE Examसीबीएसई परीक्षा