शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती तुटली! पुण्यात भाजपा-NCP वेगळे लढणार; अजित पवार म्हणाले, "मी माझं सर्वस्व..."
2
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
3
Plane Crash Mexico Video: इमर्जन्सी लँडिंगआधीच विमान कोसळले; भयंकर अपघातात १० जण ठार
4
TV खरेदीचा विचार करत असाल तर आत्ताच करा, जानेवारीपासून किंमत वाढवण्याची तयारी; कारण काय?
5
आचारसंहिता लागण्यापूर्वी सत्ताधाऱ्यांची धावपळ; प्रकल्पाची उद्घाटने, भूमिपूजन अन् घोषणांचा सपाटा
6
धनुर्मासारंभ: ९ राशींना शुभ काळ, सूर्यकृपेने दुप्पट लाभ; पद-पैसा वाढ, धनुसंक्रांती ठरेल खास!
7
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
8
कोट-पँट घालून फिरलात तर अटक अटळ! शिक्षा लेखी नाही, पण चाबकाचे फटकारे अन्...
9
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
10
क्रिकेटवेड्या देशाने मेस्सीवर जीव टाकला... पुढे? भारतीय फुटबॉलच्या विकासासाठी काय?
11
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
12
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
13
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
14
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
15
शत्रूला दिसणारच नाही भारताचे लढाऊ विमान, जळगावच्या बहिणाबाई विद्यापीठाचे संशोधन
16
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
17
सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला-उत्तर कमी, गुंता अधिक! न्यायालयीन सल्ल्यामुळे राजकीय अनिश्चितता वाढली
18
आचारसंहितेच्या आधीच निधीचे जीआर, उद्घाटने अन् भूमिपूजनाचा सपाटा; आयोगाची करडी नजर
19
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
20
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात कोरोना काळात ७० मुली बेपत्ता, ५९ घरी परतल्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 11:24 IST

Girls go missing in Washim district २० वर्षांपर्यंतच्या मुलींचे अचानक घर सोडून जाण्याचे प्रमाण गेल्या काही दिवसांत वाढलेले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कोरोना काळातील नऊ महिन्यात जिल्ह्यात एकूण ७० मुली घरून निघून गेल्या. त्यातील ५९ मुली पुन्हा घरी परतल्या; तर ११ मुलींचा अद्याप शोध लागलेला नाही. पोलिसांकडून याप्रकरणी कसून चौकशी सुरू असल्याची माहिती मिळाली.ठरावीक वय ओलांडल्यानंतर साधारणत: २० वर्षांपर्यंतच्या मुलींचे अचानक घर सोडून जाण्याचे प्रमाण गेल्या काही दिवसांत वाढलेले आहे. दरम्यान, वाशिम जिल्ह्यात २०२० मधील कोरोना काळात ७० मुली बेपत्ता झाल्याची प्रकरणे उघडकीस आली. यासंदर्भात त्या-त्या पोलीस ठाण्यांमध्ये रीतसर तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीची पावले उचलत तपासकार्य हाती घेतले. मित्र, मैत्रिणींच्या सांगण्यावरून तथा मोबाइलवरील लोकेशनसह इतर स्वरूपातील सुगाव्यांवरून राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पोलिसांचे पथक पाठवून ७० पैकी ५९ मुलींचा शोध घेण्यात वाशिम पोलीस दलाला यश मिळाले आहे; परंतु ११ मुली अद्याप बेपत्ता असून त्यांचा सातत्याने शोध घेतला जात आहे. वयात आलेला मुलगा किंवा मुलगी घर सोडून जाण्याच्या कारणांबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी ठाकरे यांच्याशी संवाद साधला असता, मुलांचा आई-वडिलांशी कमी होत चाललेला संवाद, मित्र-मैत्रिणींसोबत अधिक काळ घालवण्याची मुभा आणि मोबाइलच्या अतिरेकी वापरामुळेच असे प्रकार घडत असल्याचे तपासादरम्यान आढळत असल्याचे ते म्हणाले. 

११ मुलींचा शोध लागेना२०२० या वर्षभराच्या काळात ७० मुली बेपत्ता झाल्या. त्यातील ११ मुलींचा मात्र अद्यापही शोध लागलेला नाही. मिळणाऱ्या गोपनिय माहितीच्या आधारे पोलीस शोध घेत आहेत. 

चार बेपत्ता मुलांचा लागला शोध२०२० या वर्षांत मुलींसोबतच चार अल्पवयीन मुलेही बेपत्ता झाल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत चारही मुलांचा शोध घेऊन त्यांना कुटुंबीयांकडे सुपूर्द केले. जानेवारी, फेब्रुवारी, एप्रिल आणि जून या महिन्यांमध्ये ही मुले बेपत्ता झाली.

जिल्ह्यात अल्पवयीन मुले-मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण तुलनेने कमी आहे. २०२० या वर्षांत ७० मुली आणि ४ मुले बेपत्ता झाली होती. त्यातील ५९ मुली आणि चारही मुलांचा शोध घेण्यात पोलीस प्रशासनास यश मिळाले आहे. इतर बेपत्ता मुलींचाही लवकरच शोध घेऊन त्यांना त्यांच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्याचे विशेष प्रयत्न केले जात आहेत. त्यात निश्चितपणे यश मिळेल अशी खात्री आहे.- वसंत परदेशीजिल्हा पोलीस अधीक्षक, वाशिम

टॅग्स :washimवाशिमCrime Newsगुन्हेगारीMissingबेपत्ता होणं