शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

रस्ते व पुलांच्या दुरूस्तीसाठी सात कोटींचा निधी!

By admin | Updated: October 15, 2016 02:36 IST

वाशिम जिल्हा परिषदेचा बांधकाम विभागाकडे एकूण ५५ कामे प्रस्तावित, एकाही कामाला सुरुवात नाही.

वाशिम, दि. १४- ग्रामीण भागातील नादुरूस्त रस्ते व पुलांच्या दुरुस्तीसाठी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने पाच कोटी ९१ लाख २६ हजार रुपयांची तरतूद केली असून, आतापर्यंंंंंत २.७४ कोटींचा निधी प्राप्त झाला आहे.ग्रामीण भागात रस्त्यांचे जाळे निर्माण करण्यासाठी विविध यंत्रणेद्वारे निधीची तरतूद केली जाते. जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातर्फेदेखील रस्ते व पुलांची सुविधा निर्माण केली जाते. यासाठी सेस फंड, जिल्हा परिषदेचा निधी, जिल्हा नियोजन विकास समिती व विविध योजनेंतर्गतचा शासन निधी अशी कोट्यवधी रुपयांच्या निधीची जुळवाजुळव केली जाते. रस्ते व पूल निर्मितीनंतर अल्पावधीतच रस्त्यांवर खड्डय़ांचे साम्राज्य निर्माण होते तसेच पुलालादेखील तडे जातात. नादुरूस्त रस्ते व पुलामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. रस्ते व पुलाच्या दुरूस्तीचे प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर उपलब्ध निधीतून या प्रस्तावांना मंजुरात दिली जाते. सन २0१५-१६ या कालावधीत जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने ह्यरस्ते व पुलांचा परीरक्षण व दुरूस्ती कार्यक्रम-गट बह्ण या शीर्षकाखाली रस्ते व पूल दुरूस्तीच्या ४५ प्रस्तावांना मंजुरात दिली असून, यासाठी पाच कोटी २१ लाख ३६ हजार रुपये निधी प्रस्तावित आहे. तसेच ह्यरस्ते व पुलांचा परीरक्षण व दुरूस्ती कार्यक्रम-गट कह्ण या शीर्षाखाली १0 प्रस्तावांना मंजुरात दिली असून, यासाठी ६९ लाख ९0 हजार रुपयांच्या निधीची तरतूद आहे. या दोन्ही कार्यक्रमांतर्गत दोन कोटी ७४ लाख ३३ हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. पावसाळा असल्याने एकाही कामाला सुरूवात होऊ शकली नाही, असे बांधकाम विभागाचे म्हणणे आहे. येत्या काही दिवसात या कामांना सुरूवात होईल, असे बांधकाम विभागाने स्पष्ट केले. सदर कामे ग्रामपंचायत, सुशिक्षित बेरोजगार संस्था, मजूर संस्था, कंत्राटदार आदींमार्फत केली जाणार असल्याचे बांधकाम विभागाने कार्यकारी अभियंता एन.डी. शिंदे यांनी सांगितले.प्राथमिक आरोग्य केंद्राची दोन कामे प्रस्तावितदोन प्राथमिक आरोग्य केंद्र व निवासस्थानांची कामे प्रस्तावित असून, यासाठी सहा कोटी ७४ लाख ५२ हजार रुपयांच्या निधीची तरतूद आहे. यापैकी एका कामाला सुरूवात झाली असून, उर्वरित काम अद्याप सुरू झाले नाही. ग्रामीण भागात रस्त्यांचे जाळे निर्माण करण्यासाठी बांधकाम विभागातर्फे नियोजन केले जाते. जिल्ह्यातील नादुरूस्त रस्ते व पुलांची दुरूस्ती करण्यासाठी निधीची तरतूद करण्यात आली. उपलब्ध निधीनुसार कामे होणार असून, मुदतीच्या आत कामे करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या आहेत.- चंद्रकांत ठाकरेउपाध्यक्ष तथा बांधकाम समिती सभापती, जिल्हा परिषद वाशिम. नादुरूस्त रस्ते व पुलाच्या दुरूस्तीची एकूण ५५ कामे प्रस्तावित आहेत. या कामांना लवकरच सुरूवात होणार असून, कामे पूर्ण करण्याची अंतिम मुदत मार्च २0१७ अशी आहे. या कालावधीत संबंधिताना कामे पूर्ण करावी लागणार आहेत. मुदतीत कामे न झाल्यास योग्य ती कारवाई केली जाईल.- एन.डी. शिंदेकार्यकारी अभियंता बांधकाम विभाग, जिल्हा परिषद वाशिम.