शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

एका कृषि सहायकावर ७ ते ८ गावांचा कारभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 16:21 IST

पश्चिम वºहाडातील तीनही जिल्ह्यांत कृषि सहायकांची पदे सध्या मोठ्या प्रमाणात रिक्त असून एका कृषि सहायकावर ७ ते ८ गावांचा कारभार सोपविला जात असल्याने कामे प्रभावित होत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : वाशिम : कृषि आणि महसूल विभागाच्या योजना गावपातळीवर राबविण्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या पश्चिम वºहाडातील तीनही जिल्ह्यांत कृषि सहायकांची पदे सध्या मोठ्या प्रमाणात रिक्त असून एका कृषि सहायकावर ७ ते ८ गावांचा कारभार सोपविला जात असल्याने कामे प्रभावित होत आहेत. विशेषत: नैसर्गिक आपत्तीने होणाºया नुकसानाचे पंचनामे करणे, अहवाल सादर करण्यास यामुळे विलंब लागत असल्याचे दिसून येत आहे.पिकांवरील कीडरोगाचे नियंत्रण, अतिवृष्टी, गारपीटीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास त्याचे सर्वेक्षण करणे, पंचनामे करून प्राथमिक व अंतीम अहवाल तयार करण्याची कामे गावपातळीवर कृषि सहायकांनाच करावी लागतात. असे असताना बहुतांश गावांमधील कृषि सहायकाचे पद रिक्त आहे. परिणामी, कृषि विभागांतर्गत सोपविण्यात येणाºया विविध कामांना न्याय देवून महसूल विभागाकडील कामे करताना कार्यरत कृषि सहायकांवर अतिरिक्त ताण येत असल्याने ते त्रस्त झाले आहेत.प्राप्त माहितीनुसार, वाशिम जिल्ह्यात ७९१ महसूली गावे असून किमान तेवढेच कृषि सहायक असणे आवश्यक आहे. मात्र, शासनाच्याच धोरणांनुसार ३ ते ४ गावे मिळून कृषि सहायकाच्या एका पदास मंजूरी देण्यात आलेला आहे. त्यातही सद्य:स्थितीत मंजूर असलेली अनेक ठिकाणची पदे रिक्त असल्याने एका कृषि सहायकास ७ ते ८ गावांमधील कामांची जबाबदारी पार पाडावी लागत आहे. यामुळे कामे प्रभावित होत असून महत्वाचे अहवाल कृषि विभाग व महसूल प्रशासनाकडे सादर करतानाही मोठी दमछाक होत असल्याने कृषि सहायक त्रस्त झाले आहेत. नजिकच्या अकोलाबुलडाणा या दोन जिल्ह्यांमध्येही कृषि सहायकांसंदर्भात अशीच स्थिती उद्भवल्याची माहिती सूत्रांनी दिली.गावपातळीवर कीड रोग सर्वेक्षण, अतिवृष्टी-पुरामुळे होणाºया शेतपिकाच्या नुकसानाचे सर्वेक्षण, पंचनामे करणे, अहवाल तयार करण्याची कामे कृषि सहायकांनाच करावी लागतात. त्यामुळे नियमानुसार कृषि सहायक कार्यरत असणे अत्यावश्यक आहे. त्यानुषंगाने कृषि सहायकांची रिक्त पदे भरण्यासाठी शासनाकडे सलग पाठपुरावा सुरू आहे.- दत्तात्रय गावसानेजिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, वाशिम

टॅग्स :washimवाशिमAkolaअकोलाbuldhanaबुलडाणाagricultureशेती