शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

वाशिम जिल्ह्यातील ६१ प्रकल्प तुडूंब

By admin | Updated: September 27, 2016 02:28 IST

वाशिम जिल्ह्यात समाधानकारक जलसाठा झाला असून २0 प्रकल्प ओव्हर फ्लो झाले आहेत.

वाशिम, दि. २६- जिल्ह्यात फेब्रुवारी आणि मार्च २0१६ मध्ये गारपिट व अवकाळी पावसाने फळपिकांसह इतर पिकांचे मोठे नुकसान झाले होते. या नैसर्गिक आपत्तीसाठी शासनाच्यावतीने ७0७ शेतकर्‍यांना ६८ लाख ५0 हजार रुपयांची आर्थिक मदत मंजूर करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने सोमवारी दिली. वाशिम जिल्ह्यामध्ये २८ फेब्रुवारी रोजी अवकाळी पावसासह गारपीट झाली होती. या गारपीटमध्ये रब्बी पिकासह भाजीपाला, फळबागा, कांदा इत्यादी पिकाचे मोठया प्रमाणात नुकसान झाले होते. या नैसर्गिक आपत्तीमुळे जिल्ह्यातील ५६८ हेक्टर क्षेत्र बाधित झाले होते. कृषी आणि महसूल विभागाच्यावतीने या पिक नुकसानाची पाहणी करून शासनाकडे अहवालही पाठविण्यात आला होता. दरम्यान, जिल्ह्यातील सर्व गारपिटग्रस्त शेतकर्‍यांना शासनाकडून आर्थिक मदत मिळावी म्हणून आमदार अमित झनक यांनी तत्कालीन मदत व पुनर्वसन मंत्री एकनाथ खडसे व राज्यमंत्री संजय राठोड यांची प्रत्यक्ष भेट घेत त्यांच्याकडे लेखी निवेदन दिले होते, तसेच अंदाजपत्रकीय अधिवेशनातही हा विषय उपस्थित केला होता. नुकसान झालेल्या शेतकर्‍यांच्या पिकाचे फळबाग, भाजीपाला, कांदा यांचे सर्व्हेक्षण करुन नुकसानाचा अहवाल शासनास सादर करण्याबात जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याशी चर्चाही केली होती. द्विवेदी यांनी विभागीय आयुक्त अमरावती यांच्यामार्फत नुकसानाबाबतचा अहवाल शासनास पाठविला. शासनाच्या १३ मे २0१५ च्या निर्णयानुसार एसडीआरएफच्या निकषानुसार शेतकर्‍यांना शेती पिके व फळपिकांच्या नुकसानाबाबत मदत देण्यात यावी यासाठी आमदार झनक यांनी मंत्रालयस्तरावर पाठपुरावा केला. ज्या शेतकर्‍यांचे ३३ टक्केपेक्षा जास्त नुकसान झाले अशा शेतकर्‍यांना बागायती क्षेत्राखालील पिकांसाठी १३ हजार ५00 रुपये प्रती हेक्टर व बहुवार्षिक पिकासाठी १७ हजार रुपये प्रती हेक्टर याप्रमाणे शेतकर्‍यांना मदत मिळणार आहे. वाशिम जिल्हयातील ३३ टक्के पेक्षा जास्त ४५८ हेक्टर मध्ये नुकसान झाले असून बाधीत शेतकर्‍यांची संख्या ७0७ आहे. त्यात रिसोड तालुक्यातील अंचळ, नेतन्सा, नावली, कोयाळी बु, कळमगव्हाण व केनवड तर मालेगाव तालुक्यातील आमखेडा, दुबळवेल, पिंपळ व मसलाखुर्द या गावाचा सामावेश आहे. वाशिम जिल्हयातील सर्व पात्र शेतकर्‍यांना ६८ लाख ४९ हजार रुपयांची आर्थिक मदत मंजूर झाली असून तहसिल कार्यालयामार्फत शेतकर्‍यांच्या खात्यात ही रक्कम जमा करण्यात येणार आहे. या रकमेमधून कोणत्याही बँकानी वसूली करु नये असे शासनाच्या आदेशात आहे.२0 प्रकल्प ओव्हर फ्लोएकबुर्जी, कोल्ही, खडकी, चाकातिर्थ, सार्सीबोथ, आमदरी, आसोला गव्हा, आसोला इंगोले, बोरव्हा, चिखली, फुलउमरी, गिद, गिरोली, कार्ली, पंचाळा, रतनवाडी, रूई, वाईगौळ, वाठोद, भिलडोंगर शेतक-यांच्या आशा पल्लवितयावर्षी प्रकल्पांत बर्‍यापैकी जलसाठा असल्याने रब्बी हंगामात सिंचन करण्याकरिता पाणी मिळेल, अशी अपेक्षा शेतकर्‍यांना आहे. गत तीन वर्षांंपासून पुरेशा जलसाठय़ाअभावी शेतकर्‍यांना रब्बी हंगामात सिंचन करता न आल्याने अपेक्षीत उत्पादन हाती आले नाही. यावर्षी जलसाठा समाधानकारक असल्याने सिंचनाची शक्यता अधिक आहे. यासाठी सलग वीजपुरवठा अपेक्षीत आहे.