शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात शंभर चाचण्यांमागे ६ बाधित; कोरोना रुग्णांत घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2020 15:46 IST

शंभरामागे ६ व्यक्तींना कोरोना संसगार्ची बाधा होत असल्याचे आरोग्य विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्ह्यात कोरोना संसगार्चे प्रमाण सातत्याने घटत आहे. जिल्ह्यात ६ नोव्हेंबरपर्यंत ५७६६ लोकांना कोरोना संसर्ग झाला. त्यापैकी ५४६५ रुग्णांनी कोरोनावर मात केली, तर १४३ लोकांचा मृत्यू झाला असून, केवळ १५७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात दरदिवशी ३०० कोरोना चाचण्या घेतल्या जात असून, त्यापैकी १८ अर्थात शंभरामागे ६ व्यक्तींना कोरोना संसगार्ची बाधा होत असल्याचे आरोग्य विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.जिल्ह्यात एप्रिल महिन्यात केवळ एक रुग्ण कोरोना बाधित आढळला. त्यानंतर महिनाभराने १२ मे रोजी दुसरा कोरोनाबाधित आढळला. याच महिन्यात आणखी सहा जण बाधित आढळले. जून महिन्यापासून कोरोना संसर्ग हळूहळू पसरू लागला आणि ऑगस्ट महिन्यापासून कोरोना संसर्गाचा वेग कमालीचा वाढला. सप्टेंबर महिन्यात, तर कहरच झाला आणि कोरोना संसर्गाची संख्या चार हजारांच्यावर पोहोचली. वाढता कोरोना संसर्ग नियंत्रणासाठी आरोग्य विभागाने व्यापक उपाय केले. शासनाच्या निदेर्शानुसार जिल्ह्यात माझे कुटुंब माझी जबाबदारी अभियान राबवून चाचण्यांचे प्रमाण वाढविले. त्यानंतर ऑक्टोबर महिन्याच्या अखेरपासून कोरोना संसगार्चे प्रमाण कमी होत गेले. त्यात ६ नोव्हेंबरपर्यंत ५७५४ लोकांना कोरोना संसर्ग झाला. त्यापैकी ५४३६ रुग्णांनी कोरोनावर मात केली, तर १४३ लोकांचा मृत्यू झाला असून, केवळ १४३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, दिवसाला जिल्हाभरात ३०० व्यक्तींच्या कोरोना चाचण्या होत आहेत. त्यापैकी १८ लोक सरासरी बाधित आढळत असल्याने चाचण्यांतील शंभरामागे ६ व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग असल्याचे स्पष्ट होते.(प्रतिनिधी)

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या