शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
3
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
4
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
5
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
6
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
7
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
8
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
9
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
10
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
11
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
12
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
13
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
14
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
15
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
16
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
17
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
18
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
19
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
20
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."

अवकाळी पाऊस, गारपिटीने ५,५९३ हेक्टर क्षेत्र बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 10:59 IST

Washim News गारपिटीने ५५९३ हेक्टर क्षेत्रावरील गहू, हरभरा, मूग, ज्वारी, कांदा, पपई आदी पिकांसह भाजीपाला व फळपिकांचे नुकसान झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात १९ ते २१ मार्च या कालावधीत वादळी वारा, अवकाळी पावसासह झालेल्या गारपिटीने ५५९३ हेक्टर क्षेत्रावरील गहू, हरभरा, मूग, ज्वारी, कांदा, पपई आदी पिकांसह भाजीपाला व फळपिकांचे नुकसान झाले. यामुळे २२ महसूली मंडळांतर्गत येणाऱ्या १४२ गावांमधील ७६०१ शेतकरी बाधित झाले असून तसा अहवाल प्रशासनाकडून राज्य शासनाकडे पाठविण्यात आला आहे. दरम्यान, २२ आणि २३ मार्च राेजी देखील  काही ठिकाणी  अवकाळी पाऊस व गारपीट झाली असून यामुळे नुकसानाचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता  आहे.तहसीलदारांकडून प्राप्त माहितीच्या आधारे, जिल्हा प्रशासनाने विभागीय आयुक्त (पुनर्वसन विभाग) यांच्याकडे २० मार्च रोजी ६६९७ शेतकऱ्यांच्या ४८८० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल सादर केला होता. त्यानंतरही अवकाळी पाऊस व गारपीट झाल्यामुळे  नुकसानग्रस्त गावे व शेतकऱ्यांचा आकडा वाढला आहे. त्यानुषंगाने १९ ते २१ मार्च या कालावधीत झालेल्या नुकसानाचा सुधारित अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला. त्यानुसार, वाशिम तालुक्यातील ६ महसूली मंडळातील ३९ गावांमध्ये १६९३ हेक्टरवरील कांदा, कडधान्य व भाजीपाला पिकांचे नुकसान झाले. यामुळे २१२३ शेतकरी बाधित झाले आहेत. मालेगाव तालुक्यातील ६ महसूली मंडळातील ४० गावांमध्ये ११७० हेक्टरवरील उन्हाळी सोयाबीन, मूग, गहू, पपई, आंबा, उडीद, तीळ, कांदा, कडधान्य व भाजीपाला पिकांचे नुकसान झाले. यामुळे १८६१ शेतकरी बाधित झाले आहेत. रिसोड तालुक्यातील ३ महसूली मंडळातील २० गावांमध्ये १६८४ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून २१८७ शेतकरी बाधित झाले आहेत. मंगरूळपीर तालुक्यातील ३ महसूली मंडळातील २२ गावांमध्ये ५०९ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून ५५८ शेतकरी बाधित झाले आहेत. तसेच मानोरा व कारंजा तालुक्यातील ४ महसुली मंडळातील २१ गावांमध्ये ५३६ हेक्टरवरील पिकांना फटका बसला आहे. यात ८७२ शेतकरी बाधित झाले आहेत, असा प्राथमिक नुकसानाचा अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला आहे. 

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीHailstormगारपीट