शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

नाल्याच्या पुरात ५५ वर्षीय इसम गेला वाहून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2020 17:15 IST

नाल्याच्या पुरात ५५ वर्षीय इसम वाहून गेल्या ची घटना १२ जून रोजी रात्री ८ वाजताच्या दरम्यान घडली.

लोकमत न्युज नेटवर्ककामरगाव (वाशिम): कारंजा तालुक्यातील भुलोडा वापटी कुपटी या मार्गावरील नाल्याच्या पुरात ५५ वर्षीय इसम वाहून गेल्या ची घटना १२ जून रोजी रात्री ८ वाजताच्या दरम्यान घडली. बाबुलाल मुकिंदा  खडसे (५५, रा. वापटी कुपटी) असे वाहून गेलेल्या इसमाचे नाव आहे. कारंजा येथील सर्वधर्म आपत्कालीन संस्थेच्या (सास) सदस्यांनी शोधकार्य सुरू केले असून, वृत्त लिहिस्तोवर मृतदेह आढळून आला नव्हता. वापटी कुपटी येथील रहिवाशी बाबुलाल खडसे हे खेर्डा बु येथे शिवणकाम व्यवसाय करीत होते. नेहमीप्रमाणे १२ जून रोजी ते खेर्डा येथे कामावर गेले. तेथून एम एच ३७, आर ८१८७ क्रमांकाच्या दुचाकीने परत येत असताना मार्गावरील नाल्यास आलेल्या पुरामुळे पाण्याचा अंदाज न आल्याने ते दुचाकीसह पाण्यात वाहून गेले. दरम्यान कुटुंबियांनी शोधाशोध केली असता त्यांची दुचाकी भुलोडा गावालगतच्या महादेव मंदिर परिसरात आढळून आली. वाहून गेलेल्या इसमाला शोधण्यासाठी सासच्या सदस्यांनी २० कि मी. अंतराच्या  नाल्याच्या काठाने शोध मोहीम राबविली; परंतु वृत्त लिहिस्तोवर वाहून गेलेला इसम आढळून आला नाही. सदर शोधकार्यात स्थानिक युवकांसह ‘सास’चे अध्यक्ष श्याम सवाई यांच्या मार्गदर्शनात जलतरणपटू विजय भिसे, अरबाज गोचीवाले, अमीर चौधरी, उसमान गुंगीवाले यांनी परिश्रम घेत आहेत.

टॅग्स :washimवाशिमAccidentअपघात