शहरं
Join us  
Trending Stories
1
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
2
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
3
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
4
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
5
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
6
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
7
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
8
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
9
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
10
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
11
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
12
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
13
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
14
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
15
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
16
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
17
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
18
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
19
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
20
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...

बियाणे, खतांचे ५२ नमुने अप्रमाणित!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2020 11:28 IST

बियाण्यांचे ४८ व खताचे ४ असे एकूण ५२ नमुने अप्रमाणित असल्याचे निष्पन्न झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात बियाणे व खतांचे नमुने घेण्याची मोहीम राबविली असून, ३१ जुलैपर्यंत बियाण्यांचे १७७ आणि खतांचे ६६ नमुने काढण्यात आले. यापैकी १९८ नमुने तपासले असून, बियाण्यांचे ४८ व खताचे ४ असे एकूण ५२ नमुने अप्रमाणित असल्याचे निष्पन्न झाले. एकूण ३८ प्रकरण न्यायालयात दाखल केले असून, पाच प्रकरणे न्यायालयात दाखल करण्याची तयारी कृषी विभागाने चालविली आहे.जिल्हा परिषद कृषी विभाग तसेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या भरारी पथकांमार्फत जिल्ह्यातील बियाणे, रासायनिक खते व कीटकनाशकांचे नमुने घेण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील सहाही तालुका स्तरावर भरारी पथके गठित केली असून, या भरारी पथकांमार्फत बियाणे, खते व कीटकनाशकांचे नमुने घेतले जात आहेत. भरारी पथकांमार्फत ३१ जुलैपर्यंत जिल्ह्यातील बियाणे, खते व कीटकनाशकांची दुकाने आणि गोदामांमधून बियाण्यांचे १७७ आणि खतांचे ६६ नमुने घेण्यात आले. त्यामध्ये कपाशी, सोयाबीन, तूर, मूग, उडीद इत्यादी बियाण्यांचा समावेश आहे. घेण्यात आलेले बियाणे व खतांचे नमुने जिल्हा परिषद कृषी विभागामार्फत नागपूर येथील बीज परीक्षण प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. बियाण्यांचे १३८ अहवाल प्राप्त झाले असून, यापैकी ९० प्रमाणित तर ४८ अप्रमाणित आढळून आले. खतांचे ६० अहवाल प्राप्त झाले असून, यापैकी ५६ प्रमाणित तर ४ अप्रमाणित आढळून आले.

यापुढेही तपासणी मोहिम सुरूच राहणारशेतकऱ्यांची फसगत होऊ नये म्हणून कृषी सेवा केंद्रांची तपासणी मोहिम सुरूच राहणार आहे. विविध कंपन्याचे बियाणे, खते प्रमाणित आहे की नाही याची पडताळणी केली जाते. अप्रमाणित नमुने आढळून आल्यानंतर, या नमुन्यातील बियाणे पेरणीसाठी कुण्या शेतकऱ्यांना विक्री केले आहे का? याची माहितीही घेतली जात आहे. खताचे नमुने अप्रमाणित आढळून येण्याचे प्रमाण कमी आहे.खते, किटकनाशकसंदर्भात शेतकºयांची फसगत होऊ नये म्हणून दर्शनी भागात माहितीपत्रक लावण्याच्या सूचना कृषी सेवा केंद्रांना दिलेल्या आहेत. किटकनाशक फवारणी करताना शेतकºयांनी दक्षता बाळगावी, असे आवाहनही कृषी विभागाने केले.

खते, बियाने नमुने तपासणी करण्यात आली. प्रयोगशाळेकडे नमुने पाठविल्यानंतर बियाण्यांचे ४८ तर खताचे ४ असे एकूण ५२ नमुने अप्रमाणित आढळून आले. एकूण ३८ प्रकरण न्यायालयात दाखल करण्यात आलेली आहेत.- विकास बंडगरकृषी विकास अधिकारीजिल्हा परिषद वाशिम

टॅग्स :washimवाशिमAgriculture Sectorशेती क्षेत्र