शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
4
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
5
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
6
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
7
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
8
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
9
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
10
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
11
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
12
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
13
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
14
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
15
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
16
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
17
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
18
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
19
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
20
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन

वाशिम शहरात पाच हजार वृक्षांचे रोपन व संगोपन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2019 13:36 IST

वाशिम :  शहर हिरवेगार करण्यासाठी वाशिम नगरपरिषद व मी वाशिमकर गृपच्यावतिने पाच हजार वृक्षांचे रोपन व संगोपन करण्याचा निर्णय येथील नगरपरिषदमध्ये झालेल्या सभेत घेण्यात आला. 

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम :  शहर हिरवेगार करण्यासाठी वाशिम नगरपरिषद व मी वाशिमकर गृपच्यावतिने पाच हजार वृक्षांचे रोपन व संगोपन करण्याचा निर्णय येथील नगरपरिषदमध्ये झालेल्या सभेत घेण्यात आला. नगरपरिषद अध्यक्ष व मुख्याधिकारी यांच्या दालनात ३० मे रोजी झालेल्या सभेस नगराध्यक्ष अशोक हेडा, मुख्याधिकारी वसंत इंगोले, बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अग्रवाल यांच्यासह मी वाशिमकर गृपचे सदस्य मोठया प्रमाणात उपस्थित होते. यावेळी नगराध्यक्ष अशोक हेडा यांनी वाशिम शहर हिरवेगार करण्यासाठी मी वाशिमकर गृप राबवित असलेला उपक्रम स्तुत्य असून या उपक्रमास आपले सहकार्य राहणार असून नगरपरिषद या गृपच्या पाठीशी असल्याचे सांगितले. तसेच नगरपरिषदेने सुध्दा या उपक्रमासाठी सहकार्य करुन शहर हिरवेगार करण्यासाठी प्रयत्न करण्याचे हेडा म्हणाले. वाशिम शहर हिरवेगार व्हावे हे आपलेही स्वप्न आहे. त्याकरिता सर्वोतपरी मदतीसाठी आपण तयार असून या महान कार्यात शहरवासियांनीही उतरुन उपक्रम यशस्वी करण्याचे आवाहन नगराध्यक्ष अशोक हेडा यांनी केले. मुख्याधिकारी वसंत इंगोल यांनी सुध्दा आपण वाशिमकर गृपने सुरु केलेल्या या उपक्रमात सुरुवातीपासूनच सहभागी आहोत. शहर विकासासाठी अश्या उपक्रमाची गरज आहे. तसेच या गृपच्यावतिने काळविट व विटाळी तलावाच्या खोलीकरण कामाबाबत आपल्याशी चर्चा केल्याने नगरपरिषदेच्यावतिने त्यांना पूर्ण सहकार्य केल्या जात आहे. जलसंधारण व वृक्षारोपण काळाची गरज असून या चांगल्या कार्यात नगरपरिषद प्रशासन पूर्णपणे पाठिशी उभे राहणार असल्याचे वसंत इंगोले यांनी सांगितले. यावेळी वाशिमकर गृप व नगरपरिषद प्रशासान यांच्या सामजंस्य करार करण्यात आला असून लवकरच संपूर्ण शहरातील कॉलनी, ओपन स्पेसमध्ये वृक्षारोपण मोहीम राबवून या अभियानाला सुरुवात करण्यात येणार आहे. यााकरिता नागरिकांनी सुध्दा सहभाग वाढविण्याचे आवाहन वसंत इंगोले यांनी यावेही केले. यावेळी वाशिमकर गृपच्या काही सदस्यांनी सुध्दा आपले विचार व्यक्त केलेत. शहरात लावण्यात येणाºया वृक्षांच्या संरक्षणासाठी वाशिमकर गृपच्यावतिने वृक्षांना टीगार्ड सुध्दा लावण्यात येणार आहेत.  सभेला वाशिमकर गृपचे सर्व सदस्यांसह नगरपरिषदेचे पदाधिकारी व कर्मचारीही उपस्थित होते.

टॅग्स :washimवाशिमWashim Nagarpalikaवाशिम नगरपालिका