शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

४७ ग्राम पंचायतींनी लोकवर्गणी भरलीच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2020 11:11 IST

७३ ग्राम पंचायतींनी लोकवर्गणीचा हिस्सा भरला असून, अद्यापही ४७ ग्रामपंचायतींनी लोकवर्गणीचा हिस्सा भरला नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्हा परिषदेच्या स्वच्छ भारत मिशनअंतर्गत जिल्ह्यातील १२० ग्राम पंचायतींमध्ये सार्वजनिक शौचालय उभारणीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले. सहा महिन्यांपूर्वी १२० ग्रामपंचायतींची निवडही करण्यात आली. यापैकी ७३ ग्राम पंचायतींनी लोकवर्गणीचा हिस्सा भरला असून, अद्यापही ४७ ग्रामपंचायतींनी लोकवर्गणीचा हिस्सा भरला नाही.ग्रामीण भागात उघड्यावरील शौचवारी कमी व्हावी याकरीता स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत वैयक्तिक शौचालयासाठी १२ हजार रुपये प्रोत्साहन अनुदान दिले जाते. याशिवाय लोकसंख्येने मोठ्या असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये सार्वजनिक शौचालयाची सुविधादेखील उपलब्ध केली जाते. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सार्वजनिक शौचालयासाठी जिल्ह्यातील १२० ग्रामपंचायतींची निवड सहा महिन्यांपूर्वी झाली. सार्वजनिक शौचालयासाठी केंद्र सरकारकडून १ लाख २० हजार आणि राज्य शासनाकडून ६० हजार असे एकूण १ लाख ८० हजार रुपये अनुदानही मिळते. ग्राम पंचायतींना लोकवर्गणीचा हिस्सा म्हणून २० हजार रुपये भरावे लागतात. मध्यंतरी मार्च, एप्रिल महिन्यात कोरोना विषाणू संसर्गामुळे ही प्रक्रिया प्रभावित झाली होती. लॉकडाऊन व संचारबंदीतून शिथिलता मिळाल्यानंतर लोकवर्गणी भरणाऱ्या ग्रामपंचायतींना सार्वजनिक शौचालयाच्या कामासाठी प्रशासकीय मान्यता प्रदान केली जात आहे. २० जुलैपर्यंत ४७ ग्रामपंचायतींनी लोकवर्गणीचे २० हजार रुपये भरले नसल्याने १.८० लाखाचा निधी पडून आहे. वारंवार सूचना देऊनही या ग्रामपंचायतींनी लवकरात लवकर लोकवर्गणीचा हिस्सा भरला नाही तर त्यांची निवड रद्द होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तीन ग्रामपंचायतींचा पुढाकारलोकवर्गणीचा हिस्सा भरून कारंजा तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींनी सार्वजनिक शौचालयाचे काम पूर्णही केले आहे.

७० ग्रामपंचायतींना प्रशासकीय मान्यतालोकवर्गणीची रक्कम भरल्यानंतर ७० ग्राम पंचायतींच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली. उर्वरीत ४७ ग्राम पंचायतींनी लवकराव लवकर लोकवर्गणी भरावी, अशा सूचना दिलेल्या आहेत. लोकवर्गणी भरल्यानंतर त्यांनाही तात्काळ मान्यता देण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी सांगितले.

 

टॅग्स :washimवाशिमSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानgram panchayatग्राम पंचायत