शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

४६६ शेतकऱ्यांना बसला अतिवृष्टीचा फटका 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2020 16:36 IST

या नुकसानाचे पंचनामे करून मंडळ अधिकाºयांनी ४ जुलै रोजी अंतीम अहवाल तयार केला आहे.  

लोकमत न्युज नेटवर्कधनज बु.(वाशिम) : परिसरात सोमवार २२ जूनच्या रात्री वादळीवाºयासह पाऊस पडला. यात १५ गावांतील ४६६ शेतकºयांच्या मिळून १९३.३७ हेक्टर क्षेत्रातील शेतजमिनीसह पिकांचे नुकसान झाले. या नुकसानाचे पंचनामे करून मंडळ अधिकाºयांनी ४ जुलै रोजी अंतीम अहवाल तयार केला आहे.  कारंजा तालुक्यात धनज बु. महसूल मंडळात २२ जून रोजी तब्बल पाच तास धोधो कोसळलेल्या पावसामुळे  अनेक शेतकºयांनी केलेल्या पेरणीसह शेतजमिनी खरडून गेल्या, तर अनेकांच्या शेतात तलावाप्रमाणे पाणी साचले. या घटनेला आठवडा उलटल्यानंतरही नुकसानाच्या पंचनाम्यांची पडताळणी करून अहवाल तयार करण्यात आला नव्हता. लोकमतने या संदर्भात ३ जुलै रोजीच्या अंकात वृत्त प्रकाशित करताच पंचनाम्यांची पडताळणी वेगाने सुरू करण्यात आली. शनिवार ४ जुलै रोजी धनज बु. महसूल मंडळ अधिकाºयांनी या नुकसानाच्या पंचनाम्याचा अंतीम अहवाल तयार केला. त्यानुसार धनज बु. येथे ३४.८६ हेक्टर, भिवरी ६.४०, धनज खु. २३.३२, हिंगणवाडी ७.५०, रामटेक ६.५५, अंबोडा, २४.४०, शिरसोली १०.४०, तामसवाडी ६.४०, भांबदेवी ९.९०, मेहा १३.१३, पेंघा (उजाड) १६.११, बोंद्रेवाडी २१.४०, माळेगाव ८.३० हेक्टर, धोत्रा जहॉगिर २.२० हेक्टर  आणि मोरपूर २.५० हेक्टर अशी १५ गावे मिळून एकूण १९३.३७ हेक्टर क्षेत्रातील सोयाबीन, तूर, कापूस आणि इतर पिकांचे नुकसान झाले, शिवाय शेतजमीन बाधित झाली आहे.  आता हा अहवाल तहसील कार्यालयामार्फत जिल्हास्तरावर पाठविण्यात येणार आहे.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेती