शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये ४६ टक्के विद्यार्थी उपस्थित;  कोरोना संसर्ग नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 10:57 IST

Washim News विद्यार्थी उपस्थिती ४६ टक्क्यांवर पोहोचली असून, ३७ हजार ७९० विद्यार्थ्यांना शिक्षणाचे प्रत्यक्ष धडे मिळाले. 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कोरोनाच्या सावटाखाली २३ नोव्हेंबरपासून इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाले. ४२ दिवसांनंतर कनिष्ठ महाविद्यालय, शाळेतील विद्यार्थी उपस्थिती ४६ टक्क्यांवर पोहोचली असून, ३७ हजार ७९० विद्यार्थ्यांना शिक्षणाचे प्रत्यक्ष धडे मिळाले. गत दोन महिन्यांपासून कोरोनाचा आलेख खाली आल्याने २३ नोव्हेंबर रोजी शाळेची पहिली घंटा वाजली. जिल्ह्यात नववी ते बारावीपर्यंत शिक्षण देणाऱ्या ३६३ शाळा असून, येथे ८२ हजार १५१ विद्यार्थी संख्या आहे. या शाळेत २५५१ शिक्षक आणि १६६८ शिक्षकेतर कर्मचारी आहेत. आतापर्यंत सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची चाचणी झाली असून, यापैकी ५१ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले. २ जानेवारीपर्यंत शाळेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती ४६ टक्क्यांवर पोहोचली. ८२ हजार १५१ पैकी ३७ हजार ७९० विद्यार्थ्यांच्या उपस्थितीची नोंद झाली आहे. महिनाभरात जिल्ह्यातील एकही विद्यार्थी संक्रमित नाहीशाळा, कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये ‘कोविड-१९’च्या नियमाचे पालन करून शिकविण्यात येत आहे. तपासणी केल्यानंतरच विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देण्यात येतो. शाळा सुरू झाल्याच्या ४२ दिवसात एकाही विद्यार्थ्याला कोरोना संसर्ग झाला नाही.

जिल्ह्यात इयत्ता नववी ते बारावीपर्यंत शिक्षण देणाऱ्या ३६३ शाळा आहेत. आतापर्यंत ३५३ शाळा सुरू झाल्या आहेत. ज्या शाळेत कर्मचारी किंवा शिक्षकाचा कोरोना चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आला, त्या शाळा बंद आहेत. उर्वरित सर्व शाळा सुरू असून, विद्यार्थी उपस्थिती सरासरी ४६ टक्क्यांवर पोहोचली आहे.            - रमेश तांगडे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) वाशिम

टॅग्स :washimवाशिमcollegeमहाविद्यालयStudentविद्यार्थी